सातारा : भरती,पदोन्नती, निलंबन, आरक्षण,अतिरिक्त अश्या अनेक बाबींचा कायद्याच्या चौकटीत अधीन राहून शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.असे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिले.
क्रास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे राज्य महासचिव नामदेवराव कांबळे व उपाध्यक्ष सुशीलकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांना भेटले.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.
यावेळी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा-विनिमय करण्यात आली. सदरच्या शिष्टमंडळात विभागीय सचिव प्रविणकुमार चांदणे,,शिक्षक- जिल्हाध्यक्ष सुशांत मोरे,उपाध्यक्ष चंद्रकांत मस्के,आरोग्य-जिल्हाध्यक्षा विद्या पारखे,मिलिंद कांबळे,ए.जी.भोसले,जी.जी.सवादकर,मनोज मस्के आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
शासन निर्णयाची तंतोतंत कार्यवाही केली जाईल: राजेश क्षीरसागर
RELATED ARTICLES