Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीपळसगावात सख्ख्या चुलत्या पुतण्यात सरपंचपदासाठी सरळ लढत

पळसगावात सख्ख्या चुलत्या पुतण्यात सरपंचपदासाठी सरळ लढत

कातरखटाव : पळसगाव ता. खटाव येथे जनार्धन मोहिते व राकेश मोहिते या सख्ख्या चुलत्या पुतण्यांमध्ये सरळ लढत होणार असून सरपंच पदासाठी चुलता की पुतण्या अशी धाकधुक पळसगावकरांना लागली आहे. या दोन्ही सरपंचपदाच्या उमेदवारांचे भवितव्य आज मतपेठीत बंद झाले. या बाबत सविस्तर वृत्त असे की, खटाव तालुक्याच्या पुर्व भागातील येलमरवाडी, पळसगाव व पडळ या तीन गावच्या सार्वत्रीक ग्रामपंचायत निवडणुका आज पार पडल्या. या निवडणुकीत येलमरवाडी येथिल दोन जागा व पळसगाव येथिल एक जागा बिनविरोध झालेल्या आहे. येलमरवाडी व पळसगाव येथे निवडणूक शांततेत पार पडली मात्र पडळ येथे एकाच छत्राखाली वाढलेल्या दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. पळसगाव येथे ब्रम्हचैतन्य शेतकरी पॅनेल व पळसगाव विकास आघाडी या दोन्ही पॅनेलमध्ये लढत झाली. एकुण तीन वार्ड मध्ये मतदान शांततेत पार पडले. दोन्ही पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार हे चुलतेपुतणे असून चुलता मोटरसायकल मेकॅनिकल आहे तर पुतण्याचा केबल व्यवसाय आहे. सकाळी अकरा वाजेपर्यन्त मतदान धीमे गतीने सुरू होते. नंतर मात्र महिलांनी व पुरुषांनी रांगा लावल्या. ग्रामपंचायतीचे मतदान असल्याने व्यवसायानिमित्त परगावी असणार्‍या सर्व मतदारांनी मतदानासाठी हजेरी लावली होती. खटाव तालुक्यातील या तीन्ही गावांच्या उमेदवारांचे भवितव्या आज मतपेटीत बंद झाले असून उदृया वडूज येथे मतमोजणी होणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular