Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीकिशोर तपासे यांचे निधन

किशोर तपासे यांचे निधन

साताराः दलित चळवळीचा नेता आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सच्चा पाईक तथा पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर भाऊ तपासे यांचे पुण्यातील खाजगी रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. दलित चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असून . दलित जनतेचा खरा पँथर हरपल्याची भावना दलित जंनतेतून होऊ लागली आहे
किशोर तपासे हे नाव उभ्या महाराष्ट्राच्या परिचयाचे होते वयाच्या लहानपणापासूनच किशोर भाऊ यांनी दलित जनतेच्या अन्याया विरोधात लढ्याला सुरुवात केली होती. सातारच्या पुरोगामी चळवळीचा चेहरा म्हणून भाऊंकडे पाहिले जात होते. विद्यार्थीदशेपासून दलित चळवळीत कार्यरत असलेले किशोर माधवराव तपासे हे दिवंगत कवी, साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथर पासून ते दलित चळवळीशी जोडले गेले होते. सातारा जिल्ह्यातील दलित चळवळीचा चेहरा म्हणून ते ओळखले जात होते.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापना केली तेव्हापासून किशोर भाऊ आठवले साहेबांसोबत कार्यरत होते. किशोर भाऊ हे मा.रामदास आठवले यांचे अगदी विश्वासु सहकारी म्हणूनच त्यांची रिपाइंच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली होती. सातारा जिल्ह्यात रिपाइं हा पक्ष वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
आपल्या आयुष्यात जे काही चढ़ उतार झाले या बाबतचे किशोर भाऊ यांनी खोळ या आत्मचरित्रतही लिहिले आहे. त्यात त्यांनी सड़ेतोड़ मांडणी करत अनेकांवर लेखणीतून फटके बाजी देखील केली आहे. दलित जनतेवर अन्याय झाला की नेहमी पुढे असणारा हा दलितांचा पँथर गेली एक वर्ष आजारपणामुळे खचला होता.गेल्या आठवड्या पूर्वीच त्यांची अचानक तबेत बिघडल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.काही दिवसातच त्यांची प्रकृती स्थिर झाली होती मात्र रविवारी रात्री त्यांनी उचराला प्रतिसाद देणे बंद केल्यामुळे त्यांची प्राणजोत मावळली त्यांच्या पश्‍चात पत्नी, 2 मुले,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. सकाळी त्यांच्यावर माहुली येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान रिपाइंचे ज्येष्ठ नेते किशोरभाऊ तपासे यांच्या अंत्ययात्रेस राष्ट्रवादीचे खा.श्री.छ.उदयनराजे भोसले, सुनील काटकर, संदीपभाऊ शिंदे, वसंत जोशी, एलआयसीचे अधिकारी, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अमर गायकवाड यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular