साताराः यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा व एज्यु. ब्रीज क्लासची विद्यार्थीनी कु. प्रज्ञा राजेंद्र कामटे हिने एमबीए फायनान्स व एच.आर.विभागात, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मध्ये प्रथम येवून सातारा जिल्हयाचे नाव गौरविले आहे. यापुर्वी सुध्दा एम.कॉम. अंतिम परीक्षेत डिस्टीक्शनमध्ये येवून डी.जी.कॉलेजचे नाव जिल्हयात चमकवले आहे.
यशाबद्दल नुकतेच विद्यापीठातून विशेष अभिनंदनीय पत्र तिला मिळाले आहे.
या यशासाठी यशोदा कॅम्पसचे प्रा.दशरथ सगरे, प्रा.मोहिते सर, प्रा.सौ. ज्योती भोसले, येजू ब्रीज क्लासेसचे संचालक प्रा.सुरज सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, व्यंकटराव मोरे, सुभाष कदम, सुरेश कदम यांनी अभिनंदन केले आहे.
कु.प्रज्ञा राजेंद्र कामटे हिस विद्यापीठात विशेष मानांकन
RELATED ARTICLES

