सातारा/वडूज: गारळेवाडी (ता. खटाव) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत गारळेवाडी येथील सौ. पूजा विकास गारळे यांची राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष टी.आर.गारळे यांच्या त्या स्नुषा आहेत.
सौ. पूजा यांचे माहेर अहिल्यानगर,सातारा आहे.सातार्यातील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी इलेक्ट्रॉनिक्स पदवी मिळाल्यावर त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणार्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.
या यशाबद्दल माजी आ. प्रभाकर घार्गे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी, दहिवडी येथील बळवंत फाउंडेशन व प्राथमिक शिक्षण बँकेचे माजी चेअरमन बळवंत पाटील, हनुमंत जवळ, पत्रकार हरिष पाटणे, बाळासाहेब थोरात, डॉ.प्रविण जाधव, गारळेवाडी अहिल्यानगर संभाजीनगर भवानीनगर धामणेर ग्रामस्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
पूजा गारळे यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड
RELATED ARTICLES