Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीराष्ट्रवादी पाटणकर गटाची विजयी रंगपंचमी साजरी ; विहे, चाफळ ग्रामपंचायती मधील...

राष्ट्रवादी पाटणकर गटाची विजयी रंगपंचमी साजरी ; विहे, चाफळ ग्रामपंचायती मधील देसाई गटाचे वर्चस्व मोडीत ; चाफळचा सरपंच फक्त दोन मतांनी विजय.

 

पाटण:- पाटण तालुक्यातील विहे, चाफळ, पाबळवाडी, डाकेवाडी या चार ग्रामपंचातींच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विहे, डाकेवाडी या दोन ग्रामपंचायतींवर पुर्ण बहुमत व चाफळ ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या उमेदवाराचा फक्त दोन मताने पराभव स्विकारत राष्ट्रावीदीच्या गटाने बहुमत मिळवित देसाई गटाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दे धक्का दिला. देसाई गटाला फक्त पाबळवाडी ग्रामपंचायत व चाफळचा दोन मताने निवडुन आलेल्या सरपंच उमेदवारावर समाधान मानावे लागले. या निकालानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी रंगपंचमीचा गुलाल उधळून विजयी रंगपंचमी साजरी केली.

सर्वांचे लक्ष लागलेल्या विहे आणि चाफळ ग्रामपंचायती मध्ये देसाई गटाचे वर्चस्व मोडीत काढत राष्ट्रवादी पाटणकर गटाने विहे ग्रामपंचायती मधे ११ जागा पैकी सरपंच पदासह ८ जागा बहुमताने घेतल्या तर देसाई गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. हर्षद कदम गटाला १ जागा मिळाली. चाफळ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी पाटणकर गटाने देसाई गटाला काटे की टक्कर देत देसाई गटाचा सरपंच पदाचा उमेदवार केवळ २ मतांनी निवडून आला. तर सदस्य पदी ४ जागा देसाई गटाला आणि ५ जागा राष्ट्रवादी पाटणकर गटाला मिळाल्या.

निवडणूक लागलेल्या चार ग्रामपंचायती पैकी चाफळ, विहे व पाबळवाडी तीन ग्रामपंचायतींवर आमदार शंभुराज देसाईंचे वर्चस्व होते. त्यापैकी पाबळवाडी ग्रामपंचायतीत सरपंच पदासह सर्व जागा जिंकुन आमदार देसाईगटाने वर्चस्व सिद्द केले. सरपंचपदी किरण बाबासो सुर्यवंशी हे निवडुन आले. सदस्य म्हणुन विशाल शशिकांत सुर्यवंशी, राजश्री शिवाजी सुर्यवंशी, संपत तुकाराम सुर्यवंशी, सुरेखा कृष्णत साळुंखे व मंगल युवराज पाबळे निवडुण आले.

डाकेवाडी ग्रामपंचायत माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे नेतृत्व मानते. याठिकाणी पुन्हा राष्ट्रवादीने बहुमत सिद्ध केले. अनिल हरी डाकवे हे राष्ट्रवादीचे सदस्य बिनविरोध निवडुन आले होते. सरपंचपदी रेश्मा अनिल डाकवे या निवडुन आल्या तर सदस्य म्हणुन शरद शामराव डाकवे, माया तानाजी साळुंखे, तुकाराम सखाराम डाकवे, सारिका शत्रुघ्न डाकवे व सिताबाई रामचंद्र डाकवे हे विजयी झाले.

संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या चाफळ ग्रामपंचायतीत सत्ताधारी आमदार देसाई गटाला मोठा धक्का बसला. सरपंच पदाचे उमेदवार सुर्यकांत कुंडलिक पाटील हे अवघ्या दोन मताने विजयी झाले. पाटणकरगटाचे तुषार दत्तात्रय पवार, राणी भिमराव चव्हाण, अर्जुन काशिनाथ कुरणे, प्रसाद रामचंद्र ढेबे, खुदीजाबी नसीर काझी असे पाच उमेदवार विजयी तर देसाई गटाचे सुरेश गणपत काटे, भारती तानाजी गुजर, संगिता शिवाजी पाटील, सुनिता दत्तात्रय कुंभार हे चार उमेदवार विजयी झाले.

तालुक्याचे प्रवेशद्वार व गेली अनेक वर्षे आमदार देसाईंची अबाधित सत्ता असलेल्या विहे ग्रामपंचायतीत देसाई गटाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेली ही निवडणुक पाटणकर गटाला रंगपंचमीचा विजयी गुलाल देऊन गेली. सरपंचपदी दिनकर तुकाराम कुंभार मोठ्या मताधिक्याच्या फरकाने विजयी झाले. अनिल यशवंत कुंभार, अंजना सुधीर संकपाळ, मंगल मोहन चव्हाण, संगिता चंद्रकांत सुतार, विनय विजय लिंबारे, अविनाश हिंदुराव पाटील, विक्रमसिंह वसंतराव पाटील व सुमन दीलीप पाटील या आठ उमेदवारांनी विजय मिळवुन राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत दिले. आमदार देसाई गटाचे नितीन विलासराव पाटील व रिहानबी दस्तगीर मुल्ला हे दोन उमेदवार विजयी झाले. तर हर्षद कदम गटाच्या सुवर्णा भिमराव संकपाळ या निवडून आल्या. या निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी रंगपंचमीचा गुलाल उधळुन विजय साजरा केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular