फलटण: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू सहकारी व सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला.
आज सायंकाळी महिला विकास मंडळ कुलाबा मुंबई येथे यशवंतराव सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. राज राजपुरोहित, आ. प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार शहाजी पाटील, सोलापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष शहाजी पवार, सातारा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अनिल देसाई, आदी माण्यवरांसह माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, फलटण नगरपरिषदेचे काँग्रेसचे सर्व नगरसेवक, नगरसेविका व असंख्य कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यां भाजपा प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात राष्टीय काँग्रेसला मोठे भगदा पडले आहे या पक्ष प्रवेशावेळी सातारा आणि सोलापुर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते एकच वादा रंजीतदादा च्या घोषनानी सभागृह दनानुन गेले होते
जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा भाजपात अधिकृत प्रवेश
RELATED ARTICLES