कराड: आटके ता. कराड येथील संदीप चंद्रकांत जाधव याची लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेमध्ये सहाय्यक कक्ष अधिकारीपदी निवड झाली. त्याचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा आटके, माध्यमिक दादासो उंडाळकर विद्यालय येथे झाले आहे.
दहावी परिक्षेत संदीप याने केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये महाविद्यालय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने बी.एड. झाल्यानंतर लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. निवड झाल्याबद्दल त्याचे सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ना.अतुल भोसले, माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, आदींनी अभिनंदन केले.
संदीप जाधव याची सहाय्यक कक्ष अधिकारीपदी निवड
RELATED ARTICLES