साताराः (अतुल देशपांडे यंाजकडून) एकीकडे लोकसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहेत तर याचवर्षी विधानसभेच्या निवडणूकीचे रंगही परिसरात भरू लागले असताना सातारा शहरातील ऐतिहासिक अशा अनेक उद्यानाची कात नगरपरिषद बदलून टाकत आहे. नुकत्याच सदरबझार मधील राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले उद्यानाचा कायापालट करण्यात आला. तसेच मागील महिन्यात गोडोली येथील राज्यातील पहिले आयुर्वेदिक गार्डन लोकार्पण करण्यात आले. आता सातारा शहरातील राजवाडा परिसरातील ऐतिहासिक श्री.छ. प्रतापसिंहराजे भोसले उद्याना जीर्णोध्दाराचे रूपातून आपला चेहरमोहरा लवकरच बदलणार आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवडयात शैक्षणिक वर्षातील परिक्षा संपून उन्हाळी सुट्याचा हंगाम सुरू होणार आहे मात्र प्रतापसिंह उद्यानाचे नुतनीकरणाचे कामकाज सुरू असल्याने बच्चे कंपनीला यावर्षी मात्र या उद्यानातील झोके, सी-सॉ, घसरगुंडया व आबालवृध्दांचील लाडकी मिनीट्रेन याचा आनंद उपभोगता येणार नाही असे वाटते. या उद्यानातील महाकाय वृक्ष आणि बगिच्यातील अनेक फुलझाडे मात्र या नुतनीकरणाच्या कामातही प्रशासनाकडून व्यवस्थीत जोपासली जात आहेत. घसरगुंडया आणि झोके असणार्या विभागात सध्या हिरव्यागार गवताचे बेड नव्या बागेत अंथरण्यासाठी पाण्याचा वापर करून हिरवेगार राखण्याचा प्रयत्न केला जात आहे लवकरच हे काम पूर्ण होवून सातारची सर्वात लोकप्रिय बाग आबालवृध्दांना आकर्षण ठरेल यात शंका नाही. या उद्यानात दिवसभर प्रवेश मिळत नसला तरी दुपारी 4 नंतर रात्री 8 पर्यत ही बाग वर्षातील सुमारे 9 महिने आबालवृध्दांसाठी मनोरंजनाचे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. या परिसरात असणारी श्री.छ. प्रतापसिंह राजवाडयासमोरील जवाहर बाग म्हणजेच गोलबाग पालिकेने लवकरात लवकर आकर्षक स्वरूपात नुतनीकरणाने सुसज्ज करावी अशी मागणी सातारकरांकडून होत आहे.
राजवाडा चौपाटीपुढील श्री.छ. प्रतापसिंह उद्यानाचा लवकरच होणार कायापालट
RELATED ARTICLES