Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीहिंगणगाव बुद्रुक येथील प्राथमिक शाळेत बसवले वॉटर प्युरिफायर

हिंगणगाव बुद्रुक येथील प्राथमिक शाळेत बसवले वॉटर प्युरिफायर

कडेगावः देशाचे संरक्षण करतानाच गावातील शालेय विद्यार्थ्यांच्याही आरोग्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी हिंगणगाव बुद्रुक येथील मडिफेन्स ग्रुप या आजी- माजी सैनिकांनी घेतली आहे.
हिंगणगाव बुद्रुक येथील प्राथमिक शाळेत वॉटर प्युरिफायर बसवून सामाजिक बांधिलकी दाखवली.ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे.
डिफेन्स ग्रुप,आजी- माजी सैनिकांच्यावतीने शुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रारंभ करण्यात आला. भारतमातेच्या सेवेबरोबर गावाची सेवा करण्याची संधी मिळाली.आपल्या गावात तयार होणारी भावी पिढी ही देशसेवेसाठी आरोग्यसंपन्न हवी यासाठी हा निर्णय घेतला आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वेळोवेळी मदत करु अशी ग्वाही डिफेन्स ग्रुप व आजी – माजी सैनिकांनी यावेळी दिली. यावेळी महादेव तोडकर यांनी स्वागत केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक रघुनाथ जगदाळे यांनी केले.पुजन रमिला तडवी यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन विलासराव आपटे यांनी केले.दरम्यान,आजी- माजी सैनिकांच्या प्रतिनिधीचा सत्कार करण्यात आला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular