फलटण : मोबाईल टॉवरची तांब्याची तार चोरी प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून याबाबत फलटण शहर पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 105 /2019 भादवि कलम 379, 427 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात मोबाईल टॉवरची तांब्याची तार चोरीस गेली होती.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तांबमळा फलटण येथे आरोपी जहांगीर ऊर्फ पप्या रेमश भोसले, लखन रमेश भोसले दोघे रा. भुरकरवाडी, ता, फलटण हे एका मोटार सायकल वर व शेखर सुरज भोसले रा . खामगांव, ता. फलटण हा एका मोटार सायकल वर जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी सो फलटण व फलटण शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे जवळ असलेल्या पांढर्या रंगाच्या पोत्यात तांब्याची तार गिळून आल्याने लागलीच तांब्याची तार दोन पंचासमक्ष पंचनामा केला. तसेच गुन्हा करणे करीता वापरलेल्या दोन मोटार सायकल व मोबाईल असे मिळून आल्याने त्यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली. त्यांचेकडे विचारपुस केली असता यातील आरोपी यांनी लोणंद व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागातील एमएससीबीचे डीपी मधील तांबे चोरी करणारे आहेत.
सदर आरोपी यांनी अशाच प्रकारचे गुन्हे एकत्रात टोळीने केलेले आहे. सदर आरोपी कडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कारचा उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग श्री डॉ अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण यांचे मार्गदर्शनाखाली एस पी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक, एस. पी. बनकर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल विरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवलकर, पोहवा भोईर, पोना सुळ, पोना गिरी, पोना घाडगे, पोकाँ मेगावडे, पोका चतुरे, पोका दडस, पोकॉ सांडगे, पोकाँ कदम, पोको लावंड यांनी सदरची कारवाई केलेली आहे.