Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीआ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर शुभेच्छांचा

आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर शुभेच्छांचा

वर्षाव वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा; कार्यक्रमांची रेलचेलसातारा : युवकांचे आयडॉल, सातारा- जावलीचे विकासपुरूष आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांनी एक वेगळा  आदर्श घालून दिला. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत, ठिकठिकाणी रक्तदान शिबीरे, एहसास शाळा, रिमांड होम यासह विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप, मिष्ठान्न वाटप करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी फ्लेक्स आणि बॅनर न लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी फ्लेक्स आणि बॅनर लावले नाहीत पण, व्हॉटस अप, फेसबुकरव, इंन्सटाग्राम आणि सोशल मिडियावर मात्र कार्यकर्ते आणि शिवेंद्रसिंहराजेप्रेमी यांच्यामुळे सलग दोन दिवस आ. शिवेंद्रसिंहराजेच झळकत होते.  आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसाची दर 15- 20 सेकंदाला एक नवी पोस्ट पडत होती. यामुळे शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस सोशल मिडीया आ. शिवेंद्रसिंहराजेप्रेमींमुळे हायजॅक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. सुरुची निवासस्थानी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी औक्षण केले. यावेळी श्रीमंत छ. रुद्रनीलराजे, श्रीमंत छ. रुणालीराजे यांच्यासह आप्तेष्ट व मित्रमंडळी उपस्थित होती. यानंतर सुरुची येथे सकाळपासूनच उपस्थित असलेल्या कार्यकर्ते व नागरिकांच्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शुभेच्छा स्विकारल्या. यावेळी नविआ पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व सदस्य, नगर पालिकेचे आजीमाजी सदस्य, सातारा आणि जावली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आजीमाजी सदस्य यांच्यासह विविध संस्थांचे  पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुची येथून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चिमणपुरा पेठेतील गारेचा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी पेठेतील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताश्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शेंद्रे येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन भवानी मातेचे दर्शन घेतले. दरम्यान, वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शुक्रवारपासूनच वाढदिवसानिमीत्त आयोजित कार्यक्रम सुरु होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजता अजिंक्य ग्रुपच्यावतीने शहर पोलीस ठाण्याच्या समोर यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आश्रमात दिव्यांगांना मोफत तीनचाकी सायकल, वॉकर, कुबड्या व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर शेंद्रे ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कुस्ती स्पर्धा झाली. यानंतर रात्री 9 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवक सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात शिव- इंद्र 2019 सन्मान लोककलांचा हा मराठी गीत, नृत्य आणि सांस्कृतिक हा बहारदार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रेशम टिपणीस, सुकन्या कालन, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर यांच्यासह झी मराठीने गौरवलेले विजेते गायक आणि गायिका यांनी सादर केलेली कला पाहण्यासाठी हजारो रसिकांनी उपस्थिती लावली होती. शनिवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता गोडोली येथील राजमाता जिजाऊ सभागृह, पालवी चौक येथे कर्तव्य सोशल ग्रुप आणि युवा मोरया सामाजिक संस्था, गोडोली मित्रसमुह यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमानी रामोशी महासंघाच्यावीते सकाळी 11 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण विभागात खाऊ वाटप करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अचानक कार्यक्रमांमध्ये वाढ झाल्याने शिवेंद्रसिंहराजे यांना पुढील सर्वच कार्यक्रमांसाठी उशिर होत गेला. दुपारनंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मेढा येथील कलश मंगल कार्यालयात जावलीतील जनतेच्या शुभेच्छांचा स्विकार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जावली पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गिरी यांच्यासह सर्व सदस्य, जावलीतील सर्व पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवार आणि शनिवारी सातारा व जावलीमध्ये ठिकठिकाणी केक कापून आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.        शुभेच्छा देण्यासाठी लोटला जनसागर…आ. शिवेंद्रसिंहराजे यांना वाढदिवसानिमीत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, आ. अजित पवार, विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, सुनिल तटकरे, निरंजन डावखरे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, आ. नरेंद्र पाटील यांच्यासह विधानसभा सदस्यांनी दूरध्वनीवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासह जिल्हा परिषद आणि सातारा, जावली पंचायत समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देण्यासाठी सुरुची निवासस्थानी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सातारा- जावली मतदारसंघासह सातारा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. उपस्थित सर्वांच्या शुभेच्छा स्विकारुन आ. शिवेंद्रसिंहराजे दिवसभरातील कार्यक्रमासाठी बाहेर पडले. सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर कोटेश्‍वर मैदानासमोरील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सायंकाळी 7 वाजल्यापासून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. सातारा- जावलीसह कोरेगाव, कराड आदी सातलुक्यातील असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याने मैदानाला जनसागराचे स्वरुप प्राप्त झाले. शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, सातारा आणि जावली व सातारा पंचायत समितीचे पदाधिकारी, व्यापारी, औद्योगिक क्षेत्रांसह शासकीय, निमशासकीय, पोलीस दल आदी क्षेत्रातील अधिकारी आणि मान्यवरांसह सातारा आणि जावली तालुक्यातील हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत आ. शिवेंद्रसिंहराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरुच होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular