Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीवाटोळे येथे शाही थाटात सामुदायिक विवाह सोहळा

वाटोळे येथे शाही थाटात सामुदायिक विवाह सोहळा

पाटण:- श्री. ष. ब्र. १०८ गुरुवर्य निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या शुभाशीर्वादाने, श्री केदारनाथ शिवसह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवी मुंबई यांच्या माध्यमातून श्री केदारनाथ चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) यांच्या विद्यमाने वाटोळे ता. पाटण येथे रविवार दि ३१ मार्च२०१९ रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री केदारनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पवार यांनी दिली आहे.

पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता आपल्या मुला- मुलींचे लग्नासारखे शुभकार्य पार पाडण्यासाठी कर्जाच्या ओझ्याखाली वर्षानुवर्षे दबत असते. हे कुठेतरी थांबविण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक हि रुपया न घेता ट्रस्टच्या वतीने डोंगरपठारावरील परिसरातील गावांतील नियोजीत वर-वधूंचा अविस्मरणीय सामुदायिक विवाह सोहळा शाही थाटात पारंपारिक धामिॅक रीतीरिवाजांसह तालुक्यातील वनकुसवडे डोंगर पठारावरील वाटोळे या गावी संपन्न होत आहे.

कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार रविवार दि ३१ रोजी सकाळी ८.३५ वाजता उदघाटन होऊन ८.४५ वाजता दीपप्रज्वलन, ९ते ११.३० वाजता हळदी समारंभ, दुपारी भोजना नंतर २.३० वाजता नियोजित सर्व वधु वरांची शाही रथ मिरवणूक, ३.३० वाजता सत्कार समारंभ व सायंकाळी ४.५५ वाजता शुभ मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. पाटण तालुक्यात डोंगर पठारावर पहिल्यांदाच भव्य दिव्य सामुदायिक विवाह सोहळा पार पडत असुन या सोहळ्यासाठी पाटण तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विवाहस्थळी जाण्यासाठी पाटण आगारातून जादा एस.टी बसेसची सोय करण्यात आली आहे.
तरी वधु वरांना शुभ आशिर्वाद देण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यास तालुक्यातील सर्व मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री केदारनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री नवनाथ पवार, विश्वस्त श्री बबन गोगावले, सचिव श्री संतोष विचारे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular