वडूज: येथील समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरास रुगणांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बंडा गोडसे, पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर, युवा कार्यकर्ते विनोद शिंदे यांच्याहस्ते या शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी फलटण येथील निकोप हॉस्पिटलचे संचालक डॉ. जे. टी. पोळ, समर्थचे डॉ. मुखर्जी, डॉ. विनय बेंद्रे यांनी शेकडो रुगणांची मोफत तपासणी केली. यावेळी अनेक रुग्णांच्या इ.सी.जी., शुगर, रक्तदाब आदी चाचण्या मोफत करण्यात आल्या.
या शिबीराचा सुमारे 750 ते 800 रुग्णांनी लाभ घेतला. प्रा. गोडसे, श्रकोळेकर यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक केले. अश्या प्रकारच्या उपक्रमांचा इतरांनी आदर्श घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. डॉ. बेंद्रे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.