फलटण: फलटण खुंटे रोडवर टेम्पो व सायकलस्वारच्या अपघातात एका बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार फलटण खुंटे रोडवर चौधरवाडी हद्दीतील दत्तनगर येथे टेम्पो नं. ाह 11 लश्र 0713 व सायकल मध्ये झालेल्या अपघातात सायकल वरून जात असलेल्या साहिल अमोल जगदाळे हा वय 14 वर्षाचा मुलगा ठार झाला असून या अपघातात रुपेश नामदेव गायकवाड वय 16 हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याची ही प्रकृती चिंताजनक आहे.
या बाबतीत अधिक माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम फलटण शहर पोलीस ठाण्यात सुरू होते.
फलटण खुंटे रोडवर टेम्पो व सायकलस्वार अपघातात एक ठार तर एक जखमी
RELATED ARTICLES