कराड: मार्च एण्डच्या निमित्ताने कराड नगरपालिकेची जोरदार करवसुली मोहिम सुरू आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही पालिकेचा कर वसुली विभाग सुरूच ठेवण्यात आला होता.
रविवारी दिवसभरात जवळपास 40 लाख रूपयांची वसुली करण्यात आली, तर रविवार अखेर एकुण 9 कोटी रूपयांचा कर भरून पालिकेच्या वतीने आता दंडासह कर वसुलीची धडक मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी कारवाईची कटुता टाळण्यासाठी तातडीने कर भरून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करवसुली प्रमुख उमेश महादर यांनी केले आहे.
पालिका हद्दीत सुमारे 17 हजार 736 मिळकतींची नोंद आहे, तर चालु वर्षाचे 11 कोटी 34 लाख रूपयांचे पालिकेचे मागणी बिल आहे गतवर्षी मार्च एण्डच्या तोंडावर पालिकेने सुमारे 10 कोटी रूपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण केले होते. यावर्षी चांगली करवसुली विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी यापुर्वीच पेठनिहाय कर वसुली पथकाच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. तर वेळेत भरावा म्हणुन नागरिकांना आवाहनही करण्यात आले होते. त्यानुसार रविवार अखेर जवळपास नऊ कोटी रूपयांची करवसुली करण्यात
रविवारी वर्षाअखेर असल्याने सुट्टीचा दिवस असुनही कर वसुली विभाग सुरू होता. नागरीकांनी कर भरण्यासाठी दिवसभर पालिकेत मोठी गर्दी केली होती. सकाळी दहा वाजल्यापासुन कर भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे पहावयास मिळाले.
रविवारी रात्री उशिरापर्यंत एकाच दिवसात सुमारे 40 लाख रूपयांचा कर वसुल करण्यात आला.
रविवार वर्षाअखेर असल्याने सुट्टीचा दिवस असुनही कर वसुली विभाग सुरू होता. नागरिकांनी कर भरण्यासाठी दिवसभर पालिकेत मोठी गर्दी केली होती. सकाळी दहा वाजल्यापासुन कर भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे पहावयास मिळाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत एकाच दिवसात सुमारे 40 लाख रूपयांचा कर वसुल करण्यात आला. सोमवारपासुन थकबाकीदारां विरोधात कारवाईची मोहीम उघडण्यात येणार असल्याचे उमेश महादर यांनी सांगितले. थकबाकीरांकडुन दंडासह करवसुली करण्यात येणार आहे. किमान कारवाईची कटुता टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन महादर यांनी केले आहे.
कराड पालिकेची वसुली 9 कोटीवर
RELATED ARTICLES