Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीखा. श्री. छ. उदयनराजे भोसले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

राष्ट्रवादी, मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहभागाने जोरदार शक्तिप्रदर्शन होणार
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआय (गवई गट), आरपीआय (कवाडे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्रमिक मुक्ती दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटना व मित्र पक्ष यांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले उदया (मंगळवार) तारिख 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने सातार्‍यात जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असून शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जेष्ठ नेते शिवाजीराजे भोसले, नक्षत्रच्या अध्यक्षा श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक – निंबाळकर, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मोहनराव कदम, आमदार आनंदराव पाटील, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी कॉग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सारंग पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, धैर्यशील कदम, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते, अविनाश मोहिते, कराड अर्बन बॅकेचे सुभाष जोशी, राष्ट्रीय कॉग्रेसचे नेते विजयराव कणसे, बाळासाहेब भिलारे, नितीन भरगुडे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे शंकरराव गोडसे, आर पी आयच्या कवाडे व गवई गटाचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक तसेच मतदार संघातील गावोगावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक आदी मान्यवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित रॅलिस उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 9 वाजता गांधी मैदान, राजवाडा येथुन रॅलिस प्रारंभ होईल त्यानंतर ही रॅली वाजत – गाजत मोती चौकातून पोवई नाक्यावर येईल. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
जिल्हयातील राष्ट्रवादी कॉग्रेस, राष्ट्रीय कॉग्रेस तसेच मित्र पक्षांचे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी – माजी पदाधिकारी, सर्व आजी – माजी नगरसेवक – नगरसेविका, सर्व ग्रामपंचायतीचे आजी – माजी सरपंच – उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते व नागरिक बंधू – भगिणींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular