साताराः जिल्हयातील इ. 5 वी ते 10 वी या माध्यमिक तर इ.1 ली ते 4थी या प्राथमिक शाळांच्या वार्षिक परिक्षांना काल सोमवार दि. 1 एप्रिलपासून सुरूवात झाली
दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात संपन्न होणार्या उच्च माध्यमिक इ. 12 वीच्या व शालांत माध्यमिक म्हणजे इ.10 वी च्या परीक्षांचे पेपर संपल्यानंतर या परीक्षांना सुरवात होते. एप्रिल महिन्यात होवू घातलेल्या पंचवार्षिक लोकसभा निवडणूकीच्या मतदान कार्यक्रमामुळे यावर्षी शाळेच्या इ.9 वी पर्यतच्या सर्व परीक्षा 10 एप्रिलपुर्वी पूर्ण करण्याचे आदेश राज्य शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषद कार्यालयाच्या शिक्षण विभागांना दिल्यामुळे या परीक्षा एप्रिलच्या 10 तारखेपूर्वीच पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यानंतर 1 मेला या परीक्षांचे निकाल जाहीर होवून नवीन शैक्षणिक वर्ष येत्या 15 जुन 2019 पासून प्रारंभ होईल.
शालेय वार्षिक परीक्षांना सुरूवात
RELATED ARTICLES