वाई: रोटरी क्लब ऑफ वाई तर्फे दुर्गम भागातील हॅपी स्कूल शाळेचे उदघाटन आणि मेडिकल कॅम्प रोटरी क्लब वाईने पंचवीस हॅपी स्कूल करायचे ठरविले आणि सत्तावीस हॅप्पी स्कूल पूर्ण केली. दिनांक 31 मार्च रोजी वागवले येथील मल्लिकार्जुन विध्यालय वागवले,रोटरी क्लबने तापोळा भागातील वागवले गावांत राबविला हॅपीस्कूलचा यशस्वी प्रयोग
राबविला असून वागविले येथील हॅपी स्कूलचे उदघाटन हे मेडिकल कॅम्प कोयना एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. के. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. वागवले हे गाव खूप दुर्गम भागात आहे. तेथे जाण्यासाठी तापोळा येथून 3 तास बोटीने प्रवास करावा लागतो. त्या शाळेत पाचवी ते दहावीचे शंभर विध्यार्थी शिकत आहेत.ते सर्व विद्यार्थी मुक्कामी शाळेत शिक्षण घेतात. वागविले भागात आजही देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरीही दळण-वळणाची सोय नसल्याने त्या भागातील विद्यार्थ्यांना शाळेतच मुक्काम करावा लागतो. शनिवार, रविवारी ही मुले घरी जातात. घरी जाण्यासाठी काही मुलांना दोन ते तीन डोंगर ओलांडून अतिशय घनदाट जंगलातून चालत जावे लागते. खुप वाईट परिस्थितीतून हे विद्यार्थी शिकतात. शाळेत मुलांना पाठविण्यासाठी विशेषतः मुलींना पाठवण्यासाठी तेथील लोकांना समजावून सांगून विद्यार्थिनींचा प्रवेश घ्यावा लागतो. रोटरी क्लबने याही दुर्गम भागातहॅपी स्कूलचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. यामध्ये खेळाचे साहित्या मध्ये लेझीम, लायब्ररी कपाट, पाचशे (500) पुस्तके, आणि डिजिटल क्लास रूम दिली आहे. आणि तसेच या भागातील मुलांचे आणि गावातील ग्रामस्थांचे रक्त तपासून त्यांना औषधे दिली. यावेळी रोटरी क्लब वाईचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, खजिनदार- मदन पोरे, लिट्रसी डायरेक्टर मदनकुमार साळवेकर, दीपक बागडे, डॉ.जितेंद्र पाटक, सोनाली शिंदे, अजित पवार, कांबळी मॅडम, निला कुलकर्णी, शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी,व रोटरीयनमोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रोटरी क्लब वाईचे अध्यक्ष यांनी मुलांना शाळेचे ड्रेस आणि मदन पोरे यांनी सिलेंडर, शेगडी देण्याचे आश्वासन दिले आहे. असे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लबने तापोळा भागातील वागवले गावांत राबविला हॅपी स्कूलचा यशस्वी प्रयोग
RELATED ARTICLES