Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीइफ्कोच्या जी.बी.सदस्यपदी मनोहर बर्गे यांची निवड

इफ्कोच्या जी.बी.सदस्यपदी मनोहर बर्गे यांची निवड

कोरेगांव : इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को ऑप लि, नवी दिल्ली ही आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था असून या संस्थेची पंचवार्षीक निवडणूक होवून यामध्ये मनोहर बर्गे यांची आर. जी. बी. सदस्य पदी निवड झाली. यापुर्वीही मनोहर बर्गे यांनी या पदावर 2010 ते 2015 या कालावधीमध्ये चांगले काम केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कोरेगांव शहर विकास वतीने मंचचे अध्यक्ष व कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक किशोर बर्गे यांचे हस्ते मनोहर बर्गे यांचा शाल श्रीफळ व बुके देवून सत्कार करणेत आला.
सत्कार करताना किशोर बर्गे म्हणाले, शेतकरी वर्गासाठी काम करणारी इफ्को ही सर्वांत मोठी संस्था असून त्या संस्थेमध्ये कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक मनोहर बर्गे यांना आर. जी. बी. सदस्य पदावर काम करण्याची संधी मिळाली ही बाब आमच्या कोरेगांव तालुक्यासाठी मोठी गौरवाची असून त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील कृषी क्षेत्रास नवजीवन मिळणार आहे. त्यांनी इफ्कोच्या सर्व योजना आपल्या तालुक्यात राबवुन कोरेगांव तालुक्यासाठी भरीव काम करून शेतकरी वर्गास सधन करावे ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या कार्याचा लौकिक दिवसेंदिवस वाढावा ही सदिच्छा.
मनोहर बर्गे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, शेती व शेतकरी वर्गाचा बारकाईने अभ्यास व त्याचे प्रगतीचा ध्यास असल्याने मला कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघात संचालक पदी काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करण्याचा योग आज माझी दुसरी वेळ इफकोच्या आर. जी. बी. सदस्य पदी निवड झाल्याने प्राप्त झाली आहे. याचा लाभ कोरेगांव तालुक्यास नक्कीच होणार आहे. आपणा सर्वांचे सत्काराबद्दल आभार.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular