Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीवडूज व दहिवडीला दि. 5 रोजी मंत्री पाटील यांच्या सभा

वडूज व दहिवडीला दि. 5 रोजी मंत्री पाटील यांच्या सभा

वडूज : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, आरपीआय , शिवसंग्राम संघटना व मित्रपक्षांचे माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवार दि. 5 रोजी वडूज व दहिवडी (ता.माण) येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर या निवडणूकीत खटाव,माण तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते पूर्ण ताकदीने उतरणार असून युतीच्या उमेदवारास सुमारे दीड लाखांचे मताधिक्क्य देणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रा. सदाशिव खाडे, तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, सतिश शेटे, मंदार जोशी, सुशिल तरटे, गोपीनाथ खाडे, विजय काळे, विजय साखरे, संदिप महाडिक, भाऊसाहेब खाडे, सुरज भांडवलकर, भानुदास काळे , श्री. पाठक आण्णा यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. येळगावकर म्हणाले, युतीचे उमेदवार श्री. नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय मायक्रो प्लॅनिंग केले आहे. गेल्या साडे चार वर्षांत केंद्र व राज्यातील भाजपा शिवसेना युती सरकारने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय, राबविलेल्या विकास योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा जगात वाढलेला नावलौकीक, पाकीस्तान, चीन या पारंपारीक विरोधक देशांचा केलेला बंदोबस्त या सर्व गोष्टी मतदारांपर्यंत बिंबविण्यासाठी आमचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. दुसर्‍या बाजूला विरोधकांकडे एक नेता व एक कार्यक्रम नाही. विकासाचा कोणताही ठोस अजेंडा नाही त्यामुळे विरोधकांबद्दल जनतेतच कमालीची नाराजी आहे.
या नाराजीचे मतांत रूपांतर करण्यासाठी ना. पाटील यांची जाहीर सभा महत्वाची ठरणार आहे. वडूज येथील सभा दुपारी तीन वाजता मनिष चित्र मंदिरात तर दहिवडी येथील सभा बालाजी मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या दोन्ही सभेला कार्यकर्ते व खटाव,माण तालुक्यातील मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही डॉ. येळगावकर यांनी यावेळी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular