Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीरहिमतपूर पोलीस ठाणे राज्यात प्रथम

रहिमतपूर पोलीस ठाणे राज्यात प्रथम

सातारा : केंद्रीय गृहमंत्रालय, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या रँकिंग ऑफ पोलीस स्टेशन 2018 पुस्तकामध्ये रहिमतपूर पोलीस ठाण्याचा राज्यात प्रथम, तर देशात 58 वा क्रमांक जाहीर झाला आहे.
याबाबतचे प्रमाणपत्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांच्या हस्ते सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते तसेच रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि जी. आर. बल्लाळ यांना देण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्रालय, नवी दिल्ली यांनी रँकिंग ऑफ पोलीस स्टेशन 2018 या पुस्तकामध्ये पोलीस ठाण्यांचा दर्जा उंचावण्यासाठी लागणारे निकष आणि गुणवत्ता याबाबतची माहिती संकलित करण्यात आली होती. यामध्ये देशातील प्रत्येक राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तीन पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली होती. या पुस्तकामध्ये सीसीटीएनएस प्रणाली, प्रलंबित मुद्देमाल, कायदा व सुव्यवस्थे प्रश्‍न, जनतेचे मत, गुन्हेगारी नियंत्रण, प्रलंबित कामांचा निपटारा, प्रतिबंधक कारवाई, जातीय सलोखा आदी निकषांद्वारे पदानुक्रम देण्यात आले होते. त्यानुसार रहिमतपूर पोलीस ठाणे या सर्व निकषांमध्ये बसल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील 87 पोलीस ठाण्यांची निवड केलेली होती. यामध्ये राज्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्याने देशात 58 वा क्रमांक मिळवला, तर राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. काल मुंबई येथे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते तसेच रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि जी. आर. बल्लाळ यांना देण्यात आले. यावेळी रहिमतपूर पोलीस ठाण्यातील पो. कॉ. व्ही. व्ही. जाधव, एस. जी. शिंदे, ए. ए. चव्हाण उपस्थित होते. पोलीस महासंचालक जैस्वाल यांनी या कामगिरीबद्दल सर्व पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular