Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीआचारसंहिता भंग प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर पाटण येथे गुन्हा दाखल.

आचारसंहिता भंग प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर पाटण येथे गुन्हा दाखल.

 

पाटण:- मानगाव फाटा (नाटोशी) ता. पाटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोकप्रतिनिधीच्यां नावाने लावण्यात आलेली कोनशिला आचारसंहितेच्या काळात उघड्यावर ठेवली कारणाने आचारसंहिता भरारी पथकाने पाटण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण व पश्चिम विभागाच्या उप अभियंता यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग प्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पाटण पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणच्या कोनशिला झाकण्याचे आदेश सर्वच संबंधित विभागांना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र तरीदेखील तालुक्यातील बाहे, मानगाव फाटा, नाटोशी येथे मान्यवर लोकप्रतिनिधींच्या नावे असलेल्या कोनशिला उघड्याच ठेवण्यात आल्या होत्या. आचारसंहिता भरारी पथकाने याठिकाणी जावून पहाणी केली. त्यानंतर भरारी पथकाचे प्रमुख तथा कोयना बांधकाम विभागाचे शैलेंद्र शिवाजी येडके यांनी याबाबत पाटण पोलिसात सार्वजनिक बांधकाम विभागाचे पश्चिम व दक्षिण उपअभियंता यांच्याविरूद्ध भा. द. वि. कलम 188 अन्वये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एएसआय गोतपागर करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular