वाई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 45 सातारा लोकसभा मतदार संघाचे भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक सुरेंद्रकुमार झा यांनी 256 वाई विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक राबविण्यात येणार्या कामांचा आढावा घेतला.
45 सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात तसेच तालुक्याच्या सर्व भागात शांततेत मतदान पार पाडण्यासाठी व मतदारांमध्ये निवडणुकीविषयी माहिती तसेच निवडणुकीत प्रथमच ततझ-ढ यंत्राचा वापर होत असल्याने मतदारांमध्ये त्याबाबत जागृती व्हावी , आयोगाच्या आदेशानुसार राबिवण्यात येणार्या निवडणूक कामांचा निवडणूक निरीक्षक सुरेंद्रकुमार झा यांनी वाई विधानसभा मतदार संघात आढावा घेतला. यावेळी द्रविड हायस्कूल व पंचायत समिती येथील मतदान केंद्राची आणि नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये ठेवलेल्या मतदान यंत्राच्या सुरक्षा पाहणी केली. त्यानंतर सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व ही सार्वत्रिक निवडणूक निर्भय व निःपक्ष पार वातावरणात पार पाडावी अशा सूचना केल्या.
यावेळी सह निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, अति. सह निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले, दशरथ काळे, मिलन कळसकर उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षकांची वाई विधानसभा मतदार संघास भेट
RELATED ARTICLES