केळघरः जावळी तालुक्यात शिक्षण विभागाने नेहमीच विविध उपक्रमांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या कामगिरीचा वेगळा ठसा उमटवला आहे. भौगोलिक परिस्थिथीवर मात करून शिक्षण विभागाने मिळवलेले हे यश स्पृहणीय असून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असलेल्या जावळी पॅटनर्साठी शिक्षकांनी बहुमोल परिश्रम घेतले आहेत. शिक्षण विभागाच्या विधायक उपक्रमांना नेहमीच सहकायर् केले जाईल, अशी ग्वाही जावळी पंचायत समितीचे गटविकास आधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
जावळी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने मेढ्यातील एस.एस.पारटे कायार्लयात आयोजित तालुक्यातील पाचवी ते सातवी पयर्ंतच्या किशोऱी मेळाव्यात ते बोलत होते.याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड, पोलीस उपनिरीक्षक अचर्ना दरेकर,भाग शिक्षण विस्ताराधिकारी के.आर.तोडरमल,वैद्यकीय आधिकारी डॉ.साधना कवारे,खेलो इंडिया स्पधेर्तील विजेती सुदेष्णा शिवणकर,केंद्रप्रमुख विजय देशमुख,संपत धनावडे, विष्णु करंजकर,अरविंद दळवी, मिलींद जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गटशिक्षणाधिकारी चव्हाण म्हणाले,या किशोरी मेळाव्याचा हेतू प्रामुख्याने किशोरवयीन मुलींना स्वतःमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन देणे, मानसिक व शारिरीक आरोग्य यांची माहिती देणे.तसेच भविष्यातील आपल्या वाटचालीची दिशा निश्चित करणे हा आहे.या मेळाव्यास जावळी तालुक्यातील 375 विद्याथिर्नी व 60 शिक्षिका उपस्थित होत्या.यावेळी श्री. राठोड, डॉ. कवारे, अचर्ना दरेकर, सुदेष्णा शिवणकर यांचीही भाषणे झाली.यावेळी विद्याथिर्नींच्या स्वअभिव्यक्तीतून निमार्ण झालेल्या कवितांचा संग्रह करून केळघर व गवडी शाळांनी तयार केलेल्या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मेढा,केडंबे,अंधारी,भणंग, दुंद,हुमगाव या केंद्रातील मुलींनी विविध विषयावर बालनाट्ये,कुडाळ केंद्राने आदिवासी नृत्य,तर केळघर, सावली केंद्रातील मुलींनी देशभक्तीपर व शिक्षणावर, शिवरायांवर पाळणा सादर केला.
चव्हाण यांनी प्रस्ताविक केले. तोडरमल यांनी स्वागत केले.शिल्पा फरांदे, योगिता मापारी,सुषमा थोरात यांनी सूत्रसंचालन केले.विष्णु करंजकर यांनी आाभार मानले.
केळघरला शिक्षण विभागाच्यावतीने किशोरी मेळावा संपन्न
RELATED ARTICLES