Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीलोकसभा निवडणुकीचा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घेतला विधानसभा निहाय आढावा

लोकसभा निवडणुकीचा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घेतला विधानसभा निहाय आढावा

सातारा : सातारा लोकसभेच्या अनुषंगाने आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी विधानसभा निहाय आढावा घेऊन कामकाजाची माहिती घेतली. काही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे आदी यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकही दिव्यांग मतदार मतदनापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना करुन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, दिव्यांग मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने ज्या सुविधा पुरविण्यासाठी सांगितल्या आहेत त्या पुरवाव्यात. तसेच दिव्यांग मतदारांसाठी सहायकाची नेमणूक करावी.
महिला आपल्या लहान मुलांना घेऊन मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी येतात. त्यांच्या मुलांना संभाळण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेवक यांच्या नेमणुका कराव्यात. तसेच त्यांच्याकडे मेडिकल कीटही द्यावे. तसेच यावेळी सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा निहाय तसेच माढा मतदार संघातील फलटण व माण तालुक्यातील मतदार संघातीलआढावा घेवून मतदान केंद्रामध्ये करण्यात येणार्‍या व्यवस्थेतबाबत सविस्तर आढावा घेऊन काहीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular