म्हासुर्णे :- (प्रतिनिधी )म्हासुर्णे ता.खटाव येथे सालाबादप्रमाणे ब्रम्हचैतन्य महाराज गोंदावलेकर यांच्या अपार भक्तीतुन म्हासुर्णे येथे गोंदावलेकर महाराजांच्या पवित्र हातातुन साकारलेल्या पुरातन श्रीराम मंदिरामध्ये जन्मोत्सव राम नवमी उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.
शनिवार दि.१३-१२-२०१७ रोजी सकाळी ते ९ या वेळेत देवाला अभिषेक व पुजा करण्यात आली.तसेच ११ वाजता सौ.सुनेत्रा भंडारे यांचे सुश्राव्य किर्तन झाले.किर्तनानंतर १२.१५ ला पुष्षवृर्ष्ठी झाली. तद्नंतर आरती झाली.व प्रसाद वाटप झाले.दुपारी ४ वाजता आस्था ओगले यांचे शास्रीय गायन झाले.अशा विविध कार्यक्रमांनी म्हासुर्णे येथे राम नवमी भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.या कार्यक्रमासाठी गावातील देवानंद इनामदार ,बबन जंगम,प्रा.ज्ञानेश्वर माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,एम.पी.माने,ऐ.आर.दबडे, प्रथमेश इनामदार,नामदेव माने,मा.ग्रा.प.सदस्या जयश्री इनामदार,गोरख कदम,गणपत माने,विठ्ठल माने,बहुसंख्येने महिला भाविक व ग्रामंस्थ उपस्थित होते.
म्हासुर्णे येथे राम नवमी निमित्त विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES