वडूज: प्रभू रामचंद्र की जय च्या जयघोषात भजन, किर्तनाच्या निनादात वडूज परिसरात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. वडूज, वाकेश्वर, नायकाचीवाडी, सिध्देश्वर कुरोली या चार गावात उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाकेश्वर येथे रामनवमी उत्सवानिमित्त संपुर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. उमेश दशरथे परभणी यांचे रामजन्म अख्यायनाचे किर्तन झाले. दुपारी सव्वा बारा वाजता प्रभू रामचंद्र प्रतिमेवर पुष्पवृष्टी झाल्यनंत मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी प्रभू रामचंद्र, श्री. लक्ष्मण, सितामाई व श्री हनुमान मुर्तीची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक भक्तांनी गुलालाची उधळण करण्याबरोबर रथावर हजारो रुपयांची देणगी अर्पन केली. रात्री ह.भ.प. बंडा महाराज कराडकर यांचे जागराचे किर्तन झाले. गणेश महाराज थोरवे यांचे काल्याचे किर्तनाने पारायणाची सांगता करण्यात आली. वाकेश्वर येथील कार्यक्रमास माजी सभापती संदिप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, अशोकराव गोडसे, डॉ. विवेक देशमुख, उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, श्रीकांत बनसोडे आदिंसह मान्यवरांनी भेट दिली. दरम्यान वडूज येथे एस.एस.इनामदार म्हासुर्णे, सिध्देश्वर कुरोली येथे पुरुषोत्तम गरवारे, नायकाचीवाडी येथे न्या. मदन गोसावी यांचे सुश्राव्य किर्तन झाले. या सर्व कार्यक्रमास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
वडूज परिसरात रामनवमी उत्साहात
RELATED ARTICLES