Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीबोलेरो जीप व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

बोलेरो जीप व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

फलटण : सातारा – फलटण मार्गावर मिरगांव खिंड येथील प्रसाद स्टोनक्रशर नजीक बोलेरो जीप व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार कुणाल शिवाजी साळुखे यांचा जागीच ठार झाला तर दुचाकीवरील एक जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी मुळीकवाडी, ता. फलटण येथील कुणाल साळुखे (वय 23) व त्याचा मित्र मयुर बाळासाहेब भोईटे (वय 23) हे दुचाकीवरून जात असताना सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मिरगांव खिंड येथील प्रसाद स्टोनक्रशर येथे फलटण बाजूकडे जात असलेल्या जीपची व दुचाकींचा धडक झाली.
या अपघातात कुणालला गंभीर इजा झाल्याने कुणाल याचा जागीच मृत्यू झाला तर गाडीवर मागे बसलेला मयूर हा जखमी झाला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular