Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीमहायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. प्राची पाटील यांचा झंझावाती प्रचार

महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. प्राची पाटील यांचा झंझावाती प्रचार

कराडः सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांनी कराड दक्षिण मतदार संघातील रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, शेरे, शेणोली, कार्वेसह 18 गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदानाचे आवाहन केले.
यावेळी कराड दक्षिणेतही परिवर्तनाची भगवी लाट पसरली असून मतदार सातारा लोकसभा मतदारसंघात बदल घडवून आणण्याच्या मानसिकतेत असल्याचे मनोगत प्राची पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना प्राची पाटील यांनी सांगितले की, विद्यमान खासदारांना सातारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे फक्त सातारा शहर असेच वाटत आहे. गेल्या दहा वर्षांत कराड दक्षिणेतील एकाही गावाला त्यांनी साधे दर्शनही दिलेले नाही मग विकासकामे तर दूरच. कराड दक्षिणच्या डोंगरी विभागात अनेक समस्या आहेत.
परंतु खासदारांना त्याकडे पहायला वेळ नाही. त्यामुळे येथील जनता आता नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीकडे मोठ्या आशेने पाहत आहे. या विभागातील समस्यांची मुळापासून जाण असल्यामुळे नरेंद्र पाटीलच खासदार म्हणून आम्हाला न्याय देउ शकतील, असे येथील लोक बोलून दाखवत आहेत. नरेंद्र पाटील यांच्यासाठी शिवसेनेसह, भाजप आणि इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचार करत असून कराड दक्षिणेतून त्यांना प्रचंड मताधिक्य मिळेल यात कोणतीही शंका नाही.
याप्रसंगी बोलताना भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या शामबाला घोडके म्हणाल्या, नरेंद्र पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आम्ही सर्वजण आमचे नेते अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहोत.
आम्हाला मिळत असलेला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता नरेंद्र पाटील यांचा विजय निश्‍चित असल्याचे संकेत मिळत आहेत. नरेंद्र पाटील हेच कराड दक्षिणमधील अनेक प्रलंबीत प्रश्‍न सोडवू शकतील असा आम्हाला विश्‍वास वाटतो.
यावेळी रेठरे जिल्हापरिषद गटाच्या सदस्या शामबाला घोडके, प्रियांका ठावरे, म्हाडाचे संचालक पैलवान आनंदराव मोहिते, प.स सदस्य बाळासाहेब निकम, पै.धनाजी पाटील, नितीन गावडे, रेठरेच्या सरपंच सुवर्णा कापूरकर, कराड तालुका भाजप अध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, शिवसेना कराड तालुका प्रमुख शशिकांत हापसे, संजय गांधी निराधार योजनेचे कराड तालुकाध्यक्ष संजय पवार, भाजपा तालुकाध्यक्षा जयश्री कारंडे, धनाजी जाधव, गोंदीच्या सरपंच जयताई मदने, वसंतराव साळुंखे, शिवाजीराव चव्हाण, ऋषिकेश महाडिक, बबनराव दमामे, वसंतराव घोडके, वसंतराव साळुंखे, धनाजी माने, राहुल पाटील, पांडुरंग निकम , नारायण शिंगाडे, शंकर निकम, किशोर पवार, संदीप यादव, सतीश बनसोडे, हरी कुलकर्णी, वंदना सुतार, उमा काळे भाजप,शिवसेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular