Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीशिक्षणातून उभी राहणारी पिढी चिरकाल टिकते ः अ‍ॅड.किशोर लुल्ला

शिक्षणातून उभी राहणारी पिढी चिरकाल टिकते ः अ‍ॅड.किशोर लुल्ला

कराड : यशस्वी पिढी घडविण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. शिक्षणातून उभी राहणारी पिढी चिरकाल टिकते, असे मत टी.बी.लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन सांगलीचे अध्यक्ष ऍड. किशोर लुल्ला यांनी व्यक्त केले. आटके(ता.कराड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी डिजीटल इन्ट्रॅटीव्ह कीट उपलब्ध करून दिले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ऍड.लुल्ला म्हणाले, येथील जिल्हा परिषद शाळेने काळानुसार बदल स्वीकारून शिक्षण क्षेत्रात बदल केले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व बौद्धिक पालन पोषण करून शाळेने आयएसओ मानांकन प्राप्त केले असून या शाळेने हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले.
येथील कर सल्लागार विकास पाटील यांनी मला फौंडेशनच्या माध्यमातून शाळेसाठी डिजिटल इन्ट्रॅटीव्ह कीट ची मागणी केली मी शाळेची माहिती घेतली. मला या शाळेत केलेल्या कौतुकास्पद बाबींची माहिती मिळताच मी शाळेसाठी डिजिटल इन्ट्रॅटीव्ह कीट दिल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
मुख्याध्यापक रासाटे म्हणाले, ऍड.किशोर लुल्ला यांनी शाळेसाठी भरीव आर्थिक सहकार्य दिले. त्याचबरोबर त्यांचे मित्र वाघसाहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे इन्ट्रॅटीव्ह किट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास एफडीएचे निवृत्त आयुक्त खोमणे सर, मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे डॉ.आनंद शेडगे, पै.धनाजी पाटील, कर सल्लागार विकास पाटील, सरपंच सुरज सुतार, उपसरपंच राजेंद्र काळे, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, सोमनाथ पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रमोद ठोके, मुख्याध्याध्यापक रासाटे सर यांची प्रमुख उपिस्थिती होती. यावेळी कांबळे यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular