निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांची लग्न लांबणीवर: बहुतांश तरुणाई चिंतेत
परळी : (अल्पेश लोटेकर)
सध्या साताऱयात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजेंची कॉलर आणि भाजप-शिवसेने युतीचे नरेंद्र पाटील यांच्या पिळदार मिशीची क्रेस असतानाच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी आमचं ठरलंय हे स्लोगन वापरत राष्ट्रवादी-कॉँग्रेस महाआघाडीचे खासदार धनजंय उर्फ मुन्ना महाडिक यांना चांगलंच टार्गेट केलय. त्यामुळेच सातार्यात कॉलर सरशी ठरत आहे, तर कोल्हापुरात आमचं ठरलंय या वाक्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चांगलाच धुमाकूळ घातलाय. त्याला प्रतिउत्तर देताना म्या बी ध्यानात ठेवलय, असे म्हणत बंटी पाटलांना पवार साहेबांनी टोलाही लगावला होता.
मात्र, महाराष्ट्रातील लग्नग्नाळू पोरांनी ह्या स्लोगनला चक्क स्वत:च्या लग्नग्नाचा संदर्भ लावत साहेब, तुमचं ठरलंय, आमचं कवा ठरायचं? असे मजेशीर स्लोगन ट्रोल केले आहे.
सध्याच्या निवडणुकीमुळे लग्नग्न जुळत नसलेल्या कार्यकर्त्यांची लग्नग्न अजून लांबणीवर पडलेत. तसं पहायला गेलं तर एप्रिल-मे लग्नग्नाचा महिना; पण या इलेक्शनमुळे लग्नग्नाळू कार्यकर्त्यांचा एक सीझनच पुढे गेलाय. गावागावांत अलिकडे कित्येक पोरं बिनलग्नग्नाची दिसून येतात. 30 वर्ष उलटलं तरी अजून लग्नग्न नाहीत. यामुळे तरुणांच्या मोठया प्रमाणात नैराश्य निर्माण होत आहे. अलिकडे कित्येक वेळा लग्नग्न जमत नाहीत म्हणून मुलं आत्महत्या करतानाची उदाहरण आपल्याला पहायला मिळत आहेत.
आधी लगीन लोकसभेचं, मग आपलं!
सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं रान चांगलंच पेटलय. इलेक्शनमुळे लग्नग्न नोंदणी व्यवसायावर चांगलाच परिणाम जाणवत आहेत. कार्यकर्ते नेत्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीत गुंतले आहेत. एरव्ही लग्नग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले कार्यकर्ते इलेक्शनमुळे आधी लगीन लोकसभेचं, मग आपलं, अशी गर्जना देऊ लागलेत.
त्यात पोरींच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. बंगला, गाडी, सरकारी नोकरी, शेतीवाडी या सर्व अपेक्षेमुळे अनेक मुलांची लग्नग्न जमेनात. गावाकडचा शेतकरी तरुणाकडे मोठया प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यातच आता लोकसभेच्या निवडणुकीनं मध्येच घोळ घातलाय. इलेक्शनमुळे लग्नग्न कार्यालये ओस दिसत आहेत. त्याच लग्न कार्यालयात नेत्यांच्या सभा मात्र रंगत आहेत. त्यामुळेच लग्नग्नाळू कार्यकर्ते नेत्यांना खासगीत विचारत आहेत, साहेब, तुमचं ठरलंय, आमचं कवा ठरायचं?
साहेब, तुमचं ठरलंय, आमचं कवा ठरायचं?
RELATED ARTICLES