Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीकोरेगाव येथे कार-दुचाकीचा अपघात, मयुर काटकर याचा मृत्यु

कोरेगाव येथे कार-दुचाकीचा अपघात, मयुर काटकर याचा मृत्यु

कोरेगाव : कोरेगाव- सातारा रस्त्यावर वसुधा पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी झालेल्या कार व दुचाकी अपघातातील गंभीर जखमी मयुर शंकर काटकर वय 23, रा. तांदुळवाडी याचा रविवारी मृत्यु झाला. याप्रकरणी कार चालकाच्या विरोधात सोमवारी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मयुर काटकर हा कोरेगाव येथे एका डंपरवर चालक म्हणून काम करत होता. शुक्रवारी तो काम संपवून रात्री 10.55 च्या सुमारास आपली दुचाकी क्र. एम. एच. 11-सी. एफ.-8152 वरुन तांदुळवाडी येथे घरी निघाला होता. वसुधा पंपासमोर सातारा बाजूने भरधाव आलेल्या व अचानक उजवीकडे वळलेल्या टाटा इंडिगो कार क्र. एम. एच. 02-पी. ए.-6813 ने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात मयुर हा फरफटत गेल्याने गंभीर जखमी झाला.
काटकर कुटुंबातील सदस्य व मित्रांनी त्याला तातडीने कोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात नेले, मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याला सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले, तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला.
अपघातानंतर इंडिगो कारचालकाने नंबर प्लेट तोडल्या आणि कारमध्ये टाकून निघून गेला होता. याप्रकरणी मयुर याचा भाऊ निलेश शंकर काटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात इंडिगो कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular