Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसंवेदनशील मतदान केंद्राची शासकीय व्याख्या विचित्र....... शांततेत मतदान होणारी...

संवेदनशील मतदान केंद्राची शासकीय व्याख्या विचित्र……. शांततेत मतदान होणारी गावे गुजरवाडी, कदमवाडी क्रिटिकल झोन मध्ये…

पाटण:- कोणत्याही निवडणुकीत संवेदनशील (क्रिटिकल झोन) म्हणल की ज्या गावात दोन किंवा दोन पेक्षा अधिक गट, मतदानावरुन समोरासमोर वाद-विवाद, संघर्ष, भांडणे, बोगस मतदान, मतदारांची पळवापळवी, शांतता भंग तनावपुर्ण वातावरण निर्माण करणारी आहेत. अशा ठिकाणी पोलिसांची जादा कुवक मागवली जाते अशी गावे किंवा मतदान केंद्र संवेदनशील (क्रिटिकल झोन) मधे गणली जात होती. मात्र सद्या सुरू असलेल्या निवडणुकीत वरील सर्व निकष बाजूला सारून ज्या मतदान केंद्रावर ७५ टक्के पेक्षा जास्त १०० टक्के पर्यंत एकाच उमेदवाराला मतदान होत असेल तर ती गावे अथवा मतदान केंद्र संवेदनशील (क्रिटिकल झोन) मधे गणली गेली आहेत. निवडणूक आयोगाची संवेदनशील ची नवीन व्याख्या सर्वांनाच विचित्र वाटणारी झाली आहे. पाटण तालुक्यात आतापर्यंत शांततेच्या मार्गाने चालणारी मतदान केंद्र गुजरवाडी आणि कदमवाडी (नाटोशी) हि दोन केंद्र संवेदनशील (क्रिटिकल झोन) मधे आल्याने आश्चर्य वाटत आहे.

गुजरवाडी (म्हावशी) आणि कदमवाडी (नाटोशी) या पाटण तालुक्यातील डोंगरावरच्या दोन वाड्या शांतता प्रिय म्हणून ओळखल्या जातात. गुजरवाडीत सरासरी तीनशे च्या आसपास मतदार आहेत. तर कदमवाडीत सव्वादोनशेच्या जवळपास मतदार आहेत. या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत पाठीमागे झालेल्या निवडणुकीत अगदी ग्रामपंचायत पासून ते विधानसभा, लोकसभा निवडणूक मतदानावेळी कोणताही संघर्ष, वादविवाद, भांडणे बोगस मतदान, तनाव निर्माण झाला नाही. केवळ एका होमगार्ड च्या बंदोबस्तात येथील मतदान होत असताना. हि दोन मतदान केंद्र संवेदनशील (क्रिटिकल झोन) मधे या निवडणुकीत आल्याने सर्वांना आश्चर्य वाटतय.. या बरोबर पाटण विधानसभा मतदार संघात निवडणूक कार्यक्रम राबविणाऱ्या महसूल विभाग, पोलीस विभागाला देखील आश्चर्य वाटते. ज्या ठिकाणी जादा पोलिसांची आवश्यकता नाही. अशा ठिकाणी बाहेरच्या राज्यातील जादा पोलीस फोर्स फाटा लावण्यात येत आहे. याचे कारण काय तर या मतदान केंद्रावर एकाच पार्टीला अथवा उमेदवाराला मतदान केले जाते. एकाच बाजूला मतदान होत असताना येथील मतदारांच्यावर दबाव आणला जातो का.? अथवा मतदान केंद्र हैक केली जातात का? असा संशय निवडणूक आयोगालाच आहे. म्हणून शांतताप्रिय असणारे गुजरवाडी व कदमवाडी मतदान केंद्र संवेदनशील (क्रिटिकल झोन) मधे आली आहेत.

राजाभाऊ काळे
अध्यक्ष- पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.
:- पाटण तालुक्यात अशी अनेक मतदान केंद्र संघर्षाची आहेत. जिथे निवडणूक काळात मतदानावरुन राजकीय कार्यकर्ते मतदारांच्यात तनावपुर्ण वातावरण निर्माण झालेले असते. बोगस मतदानाचाही प्रयत्न होत असतो. कधी कधी काटे की टक्कर संघर्ष झालेला असतो. अशा ठिकाणी शांततेच्या मार्गाने मतदान होण्यासाठी जादा पोलीस बंदोबस्त लावून हि मतदान केंद्र संवेदनशील (क्रिटिकल झोन) घोषित केली गेली आहेत. मात्र जिथे कोणताही असा प्रकार घडतच नाही. ती गुजरवाडी आणि कदमवाडी मतदान केंद्र संवेदनशील मधे आल्याने आश्चर्य वाटत आहे. ८० आणि नव्वद टक्के च्या पुढे ऐकाच उमेदवारांना मतदान होणारी पाटण तालुक्यात अनेक मतदान केंद्र आहेत. मग गुजरवाडी, कदमवाडी चाच समावेश संवेदनशील मधे का? असा प्रश्न राजाभाऊ काळे यांनी प्रतिक्रिया देताना केला.

सुरेश पाटील
पाटण तालुका शिवसेना प्रमुख.
:- कदमवाडी आणि गुजरवाडी शांततेच्या मार्गाने चालणारी मतदान केंद्र आहेत. येथे गावाचा सामाजिक आणि राजकीय बाजूत एकोपा चांगला आहे. मतदानावेळी देखील पक्ष आणि गटाच्या बाजूने ऐकोपाने मतदान करणे हा त्यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे. निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे अशा परस्थितीत या निवडणुकीत हे दोन्ही मतदान केंद्र संवेदनशील (क्रिटिकल झोन) मधे टाकल्याने लोकांच्यात संभ्रम आणि भितीचे वातावरण निर्माण झाले. पाटण तालुक्यात अशी अनेक मतदान केंद्र आहेत. की जिथे नेहमी मतदानावेळी तनाव पुर्ण वातावरण निर्माण होतात. हि मतदान केंद्र सोडून शांततेत असणाऱ्या मतदान केंद्रावर क्रिटिकल- संवेदनशील चा टपका ठेवून निवडणूक आयोगाने चुक केली आहे.

अगंध जाधवर
डि.वाय.एस.पी.- पाटण.
:- निवडणूक आयोगाने संवेदनशील (क्रिटिकल झोन) चा सर्वे करुन गुजरवाडी (म्हावशी), कदमवाडी (नाटोशी) हि दोन मतदान केंद्र संवेदनशील मधे टाकली आहेत. केवळ येथे एकाच उमेदवारांना ७५ टक्के पेक्षा जास्त १०० टक्के पर्यंत मतदान होते. हे मतदान होत असताना याच्या पाटीमागची खरी कारणे शोधायला हवी होती. सामाजिक किंवा राजकीय ऐकोपा ठेवून शांततेच्या मार्गाने एकाच पक्षाला अथवा गटाला झालेले मतदान संवेदनशील (क्रिटिकल झोन) मधे आणने चुकीचे आहे. मात्र निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार चालावे लागते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular