Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीमाथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना मातृशोक

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना मातृशोक

कराड : माथाडींचे आराध्य दैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी व माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे गुरुवार दि.25 एप्रिल,2019 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 65 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्याच्या पाश्चात दोन मुली, तीन मुलगे नातवंडे असा परिवार आहे.
माथाडी कामगार चळवळ उभी करताना वत्सलाताई पाटील यांनी स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली होती. स्व.आमदार अण्णासाहेबांच्या निधनानंतर माथाडी कामगार चळवळ पुढे नेह्ण्यासाठी त्यांनी खंबीरपणे माथाडी नेत्यांना साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत माथाडी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. स्व.अण्णासाहेब पाटील यांचे कार्य पुढे नेह्ण्यासाठी त्या नेहमीच पुढे येवून कार्यात सहभागी होत होत्या. स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांच्या आकस्मित निधनानंतर कुटुंबियातील सर्वांना त्यांनी मातोश्री व पिताश्रीच्या भूमिकेत राहून येणा-या प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यासाठी पाठबळ दिले. वत्सलाताई अण्णासाहेब पाटील या माथाडी कामगार चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत होत्या त्यामुळे त्यांच्याबद्दल कामगारांमध्ये एक वेगळी आस्था होती त्यांच्या निधनामुळे कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या धर्मपत्नी वत्सलाताई पाटील यांनी माथाडी कामगार चळवळीत भाग घेण्याबरोबर मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या पश्चात डॉ.हणमंतराव पाटील,माथाडी हॉस्पीटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तर नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे संघटनेचे नेते व सरचिटणीस आणि माजी आमदार व मंत्री आहेत, तसेच रमेश अण्णासाहेब पाटील हे माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक व सातारा जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कन्या अ‍ॅड. भारतीताई पाटील या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत.
वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे पार्थिव शुक्रवार दि.26 एप्रिल,2019 रोजी सकाळी 9:00 वाजता माथाडी भवन,तुर्भे,नवीमुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular