Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीचिखली येथे जानाईदेवीची 29 रोजी प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण

चिखली येथे जानाईदेवीची 29 रोजी प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण

परळी : चिखली (ता. सातारा) येथे श्री जानाईदेवीची प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळयाचे आयोजन सोमवार 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजुभैय्या भोसले, माजी सभपती सुनिल काटकर, अमितदादा कदम, गुरुदत्त उद्योग समूह आंध्रप्रदेशचे बापूशेठ सपकाळ, श्रेयश टूर्स ऍन्ड कंपोनंटस् भोसरी पुणे अशोकशेठ साळुंखे, सुदामा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे संस्थापक सुदामशेठ पवार, पाटेश्वर इलेक्ट्रीकलचे सुभाषशेठ चव्हाण, कृषी मित्र ऍग्रो इंपॅक्स प्रा. लि. चे डायरेक्टर महेश रसाळ, समाजसेवक मारुती पवार, पुण्याई ट्रॉन्सपोर्स्टचे यशवंत गंगावणे, गुरुदत्त फॅब्रीकेशन पुणेचे रमेशशेठ जाधव, समाजेवक बाबुराव लोटेकर, श्री जानाई मळाई शिक्षणसंस्थेचे संस्थापक दलितमित्र शिवराम माने, सुरेश पवार, मंदीर शिल्पकार बालाजी नागरगोजे, सरपंच सौ. सोनाबाई झुंजार, उपसरपंच भानुदास शिर्के, तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदा शिर्के, चिखली मुंबई मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र शिर्के, उपाध्यक्ष लक्ष्मण शिर्के, खजिनदार शंकर शिर्के, सहखजिनदार महादेव जाधव यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी रविवार दि.28 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजता देवदेवतांची ग्रामप्रदक्षिणा, (मिरवणूक) यामध्ये ग्रामस्थ मंडळ बामणेवाडी, जांभे, चोरगेवाडी, पाडेकरवाडी, यांचा ढोल लेझीमच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सोबतच सनई ताफ्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 8 वाजता जिल्हा परिषद शाळा व लोकमान्य हायस्कूल चिखली येथील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन व गुणगौरव कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम डॉ. किरण शिर्के (सेल टॅक्स ऑफिसर) यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी बाळू जाधव (फौजी) व भरत शिर्के (सहाय्यक सेल टॅक्स ऑफिसर) यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार 29 रोजी पहाटे 5 वाजता काकड आरती होणार असून सकाळी 10 वाजता मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण व प्रवचण श्री. ष. ब्र. 108 ज्ञानभास्कर सदगुरु महादेव शिवाचार्य महास्वामीजी (वीरशैव मठ संस्थान वाई) यांच्या शुभहस्ते व भागातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न होणार आहे.
दुपारी 1 वाजता माहेरवासींनसाठी हळदी-कुंकु समारंभ व वाण वाटप, दुपारी 2 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 8 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज बोधले (डिकसळकर, तारळे) यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 10 वाजता दत्ता शिंदे व ज्ञानेश्वर चव्हाण (गोंधळी) वर्णे आबापुरी यांचा जयभवानी जागरण, गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार 30 रोजी पहाटे 6 वाजता काकड आरती, दुपारी 4 वाजता महाप्रसाद, रात्री 8 वाजता श्री गगणगिरी प्रासादिक नाटयरुपी भारुडी भजन मंडळ मौजे डफळवाडी (मणदुरे, ता. पाटण) व श्री काळभैरवनाथ नाटयरुपी भारुडी भजन मंडळ जांभे (ता. सातारा) यांचा सामना होणार आहे.
बुधवार 1 मे रोजी सकाळी 11 ते 4 भंडाऱयानिमित्त ग्रामस्थ भजन मंडळ चिखली यांचा सुस्वर संगीत भजनाचा कार्यक्रम होईल दुपारी 4 वाजता दहिहंडी व दुपारी 5 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व भक्तांनी या सोहळयाचा लाभ घ्यावा असे अवाहन ग्रामस्थ मंडळ चिखली, ग्रामस्थ मंडळ चिखली (मुंबई), श्री जानाईदेवी स्पोर्टस क्लब, श्री जानाईदेवी चॅरिटेबल ट्रस्ट, श्री जानाईदेवी सेवाभावी संस्था चिखली यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular