Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडी9 वर्ष विहीर अनुदानापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण

9 वर्ष विहीर अनुदानापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण

फलटण: तरडगाव ता फलटण येथील छाया किसनराव मोहिते यांनी गेली 9 वर्ष विहीर अनुदानापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ 23 एप्रिल पासून तरडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करत मतदान न करता मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
प्रशासनच्या अशा गलथान कारभारामुळे अनुदान न भेटु न शकलेल्या लाभार्थी यांसह इतरांना मतदान न करण्याचा निर्णय घ्यावा लागत असेल तर मतदान करा लोकशाही बळकट करा असा नारा देणारे प्रशासनच लोकशाहीचे तीनतेरा वाजवित आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेली 9 वर्ष विहीर अनुदानापासून वंचित राहिलेल्या छाया मोहिते यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत सिंचन विहीरीच्या त्या लाभार्थी बनल्या होत्या.प्रशासकीय नियमानुसार त्यांनी मंजूर झालेल्या विहिरीचे काम पूर्ण करुण याबाबतचा अहवाल ही सादर केला होता.
संबंधित अधिकारी यांनी पाहणी ही केली होती.परंतु राजकीय हेतुने अनुदान मिळत नसल्याचा आरोप केला जातो आहे. 2011 पासून ते आजतागायत त्यांना सिंचन विहिरीचे कोणतेही अनुदान प्राप्त झालेले नाही.अनुदान न मिळालेल्या छाया किसनराव मोहिते यांचे प्रकरणास प्रशासकीय मान्यता असताना.
देखील गेली 9 वर्ष प्रकरण प्रशासनाने राजकीय व भ्रष्टाचारी हेतुने प्रलंबित ठेवल्यामुळे अनुदान रक्कम मिळाली नसल्याने लाभार्थी यांनी कर्ज काढून प्रकल्प पूर्ण केला व् गेली अनेक वर्ष अर्ज विनंत्या आत्मदहन नोटिस देऊन ही कार्यवाही झाली नाही. परंतु सद्य स्थितीत छाया मोहिते या कर्जाच्या छायेत अडकलेल्या आहेत.
त्यामुळे मंजूर असणारे अनुदान रक्कम व बैंक कर्ज व्याजासह नुकसान भरपाई प्रशासन तथा जि.प.व गट विकास अधिकारी पंचायत समिती अधिकारी फलटण यांचेकडून 10 दिवसांत लेखी हमी सह व चेक ने रक्कम रूपये 10 लाख नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लाभार्थी छाया मोहिते आणि पती किसनराव मोहिते यांच्यासह तालुक्यातील बेलदार समाजाच्या वतीने तसेच तरडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे.यावेळी विविध सामाजिक संघटना यांनी या उपोषणास पाठिंबा दिला.
23 एप्रिल ला माढा लोकसभा मतदार संघाची निवडणूक होती. या दिवशीच छाया मोहिते आणि त्यांचे पति किसनराव मोहिते यांनी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी लाभार्थी यांसह मोहिते कुटुंबातील 22 मतदार तसेच इतर ही काही ग्रामस्थ यांनीही मतदान न करता मतदानावर बहिष्कार टाकला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular