साताराः सहकार क्षेत्रात सक्षम व आदर्श पतसंस्था म्हणून मा. राज्यपाल यांचे हस्ते सहकार भूषण पुरस्कार देवून गौरविलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 278 कोटी व्यवसाय करुन गतवर्षीच्या तुलनेत 11 कोटी इतकी व्यवसायात वाढ केली आहे. पारदर्शक कारभाराच्या जोरावर सन 2018-2019 मध्ये ढोबळ नफा रु. 5 कोटी 06 लाख मिळविला असून सर्व कायदेशीर तरतूदी करुन रु 4 कोटी 54 लाख इतका निव्वळ नफा मिळविला आहे. व्यवसाय वाढीचे व भविष्यातही संस्थेची सक्षमता व स्थैर्य असेच भक्कम राहणेचे दृष्टीने संस्थेने एन.पी.ए. ची 100 ं/. तरतुद केली आहे. निव्वळ नफयाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण 2.26: असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांनी दिली. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले की, सहकार खात्यांचे सर्व निकष, मानांकने इ. ची पूर्तता संस्था प्रत्येक वर्षी करतेच. यावर्षीसुध्दा ऑडीट गुणतक्त्यातील निकषांची पूर्तता संस्थेने पूर्ण केली असुन शासकीय लेखापरीक्षणानंतर संस्थेस सर्वोच्च असा ऑडीट वर्ग अ निश्चितच मिळेल. संस्थेचे संचालक मंडळाने व्यावसायिक व्यवस्थापनाचे धोरण समोर ठेवून वेळोवेळी प्रभावीपणे निर्णय घेतले तसेच सर्व संचालक व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देउन संस्थेचा कारभार नियोजनबध्द करुन संस्थेची प्रतिमा समाजात उंचावली आहे. नियमित कर्जपरतफेड करणार्या सभासदांना व्याजदरात सुट (रिबेट) हि योजनाही या वर्षापासून सुरु केली आहे तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखा संपूर्ण संगणकीकरणासह स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत आहेत. सभासद, ठेवीदार, कर्जदार, कष्टाळू सेवक यांचे सहकार्यानेच आपणांला हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले व याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
31 मार्च 2019 अखेर संस्थेच्या ठेवी रु 165 कोटी 97 लाख झाल्या आहेत तसेच संस्थेने कर्जपुरवठा रु. 112 कोटी 01 लाख केला असून रु. 87 कोटी 24 लाखाची सुरक्षीत गुंतवणूक केली आहे. संस्थेचे वसूल भाग भांडवल रु. 10 कोटी 16 लाख व खेळते भांडवल रु. 206 कोटी 86 लाख इतके झाले असल्याचे त्यांनी सांगीतले. ते पुढे म्हणाले की, संचालक मंडळाने कृती आराखडयानुसार कामकाज करुन आवश्यक तेवढाच खर्च करुन काटकसरीचे धोरण राबविल्यामुळे व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण फक्त 1ण्30: इतके अत्यल्प राखले आहे धन्वंतरीच्या परंपरेनुसार यावर्षीही कर्ज वसुलीचे प्रमाण 95: इतके राखले असुन नेट एनपीए चे प्रमाण अत्यल्प आहे. सी.डी. रेशो 5887: व सी.आर.ए.आर. चा निकष कमीतकमी 9: आवश्यक असताना संस्थेने तो 31ण्01: इतका राखला आहे. संस्थेचा प्रति सेवक व्यवसाय रु. 5 कोटी 05 लाख असून प्रति सेवक नफा रु. 8 लाख 26 हजार आहे. सेवक वर्गाने केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबदद्ल संचालक मंडळाचे सभेमध्ये त्यांचे अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टि.व्ही व सुरक्षा प्रणाली प्रत्येक शाखेत बसविली आहे. माहीती व तंत्रज्ञानाचा वापर संस्थेच्या सभासद, ग्राहकांना व्हावा यासाठी संस्थेने स्वत:ची वेबसाईट कार्यान्वित केली असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी संस्थापक-चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांनी केले.
याप्रसंगी बालताना व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अहोरात्र कष्ट तसेच कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष संचालक मंडळ. जनतेचा संस्थेवरील दृढ विश्वास यामुळेच संस्था दिवसेंदिवस उल्लेखनीय कार्य करीत आहे. सुलभ व त्वरीत कर्ज वितरण, प्रभावी वसुली, व्यवस्थापन खर्चातील घट, सेवक कार्यक्षमतेत वाढ यांच्या सहायाने संस्था दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संस्था विविध सामाजिक उपक्रमात भाग घेत असते. स्थापनेपासून अ वर्ग, प्रतिवर्षी लाभांश अशा अनेक बाबींमुळे लोकांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित करणार असून त्यामुळे ग्राहकांना एसएमएस बॅकीग, नेट बँकींग, एनइएफटी व आरटीजीएस सारख्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय यादवराव पवार यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ.क.श्री. लाहोटी, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. अरविंद काळे, डॉ. शकील अत्तार, डॉ. सुनिल कोडगुले, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र सरगर, डॉ.राजेंद्र जाधव, डॉ. कैलास खडतरे, डॉ. सौ. सारीका मस्कर, अॅड. सुर्यकांत जाधव, डॉ. अभिजीत भोसले व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
धन्वंतरी पतसंस्थेस रु. 5 कोटी 06 लाखाचा नफा
RELATED ARTICLES