Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यातील जंगल क्षेत्रात कमालीची घट

राज्यातील जंगल क्षेत्रात कमालीची घट

सातारा : राज्यातील जंगल क्षेत्र सातत्याने कमी होत असून गेल्या तीन वर्षांत राज्यातील 633 चौरस किलोमीटर इतके जंगल क्षेत्र कमी झाले असल्याचे विविध सरकारी अहवालांच्या विश्लेषणांवरून दिसून येते. विशेष म्हणजे ही घट वनखाते आणि फॉरेस्ट डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीतील असल्याचे दिसून येते.
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2017 आणि 2018 नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये राज्यातील एकूण वनक्षेत्र हे 61369 चौरस किलोमीटर इतके असल्याचे म्हटले आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 19.9 टक्के इतके भरते. यामध्ये वनखात्याच्या अखत्यारीत 55,431 चौरस किलोमीटर, फॉरेस्ट डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीत 3604 चौरस किलोमीटर, वनखात्याच्या अखत्यारीत असलेली खासगी वने 721 चौरस किलोमीटर तर महसूल खात्याच्या अखत्यारीत 1613 चौसर किलोमीटर असे मिळून एकत्रित 61,369 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे.
पण 2009 आणि 2010 चा वनखात्याच्या वार्षिक अहवाल पाहिला तर राज्यातील एकूण वनक्षेत्र हे 61,939 चौरस किलोमीटर इतके असल्याचे दिसून येते. यामध्ये वनखात्याच्या अखत्यातीतील 55,367 चौरस किलोमीटर, महसूल खात्याच्या अखत्यारीमधील 2449, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीतील 3563 आणि खासगी मालकीच्या पण वनखात्याच्या अखत्यारीत येणार्‍या जंगलांखालील क्षेत्र हे 560 चौसर किलोमीटर इतके असल्याचे यात दिसते.
2009- 10 चा वनखात्याच्या अहवाल आणि राज्याच्या 2017 आणि 2018चा आर्थिक पाहणी अहवाल यांची तुलना केली तर राज्यातील 581 चौरस किलोमीटर इतके जंगलक्षेत्र कमी झाले असल्याचे दिसून येते. इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट 2011 या केंद्रसरकारच्या अहवालात देखील राज्याचे त्यावेळचे एकूण वनक्षेत्र हे 60945चौरस किलोमीटर इतके असल्याचे म्हटले आहे.
गेल्या तीन दशकातील स्थिती जर पाहिली तर जंगलांची सातत्याने घटल्याचे दिसते. उपलब्ध आकडेवारीनुसार 1984-85 मध्ये राज्यातील जंगलाखालील क्षेत्र 62,971 चौरस किलोमीटर इतके होते. हा विचार केला तर गेल्या तीन दशकात राज्यातील 1602 चौरस किलोमीटर इतके जंगल क्षेत्र कमी होत झाले असल्याचे लक्षात येते. राष्ट्रीय वनधोरण 1985 नुसार एकूण क्षेत्रफळाच्या 33 टक्के क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक आहे, पण राज्यातील हे क्षेत्र वाढण्यापेक्षा कमीच होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. चौकट- घटलेले वनक्षेत्र 1 ) पुणे – 131 चौकिमी 2 ) सातारा – 193 चौकिमी 3 ) सांगली – 210 चौ किमी 4 ) कोल्हापूर – 97 चौ किमी.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular