सातारा ः बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही देशातील बांधकाम व्यावसायिकांची क्रमांक एकची संस्था असून संपूर्ण देशभर या संस्थेचा विस्तार झाला आहे. त्यामधून बांधकाम व्यावसायिक व यासंबंधीत निगडीत असलेल्या प्रत्येक घटकांचे प्रश्न सोडवले जातात. बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेने आजपर्यंत 29 वर्षांच्या कालावधीत सुवर्णाक्षराने लिहावे असे काम केले आहे. सातारा सेंटरचा नावलौकीक संपुर्ण देशमभर झाला असल्याचे उद्गार बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे वेस्ट झोनचे व्हाईनस प्रेसिडेंट निमीष पटेल यांनी काढले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या 2019-20 या कालावधीसाठीच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी निमिष पटेल बोलत होते. यावेळी बीएआय चे माजी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष प्रकाश पंजवानी उपस्थित होते. यावेळी श्री.छ. उदयनराजे यांनी नूतन अध्यक्ष अशोक शिंदे यांचा विशेष सत्कार केला व मनोगत व्यक्त केले. यावेळी सातारा सेंटरचे माजी अध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी नूतन अध्यक्ष अशोक शिंदे व माजी सेक्रेटरी नितीन माने यांनी नूतन सेक्रेटरी श्रीराज दिक्षित यांना पदाची सूत्रे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रदान केली. यावेळी बिल्डर्स असोसिएशनच्या वुमन्स विंग-स्फूर्तीचा शुभारंभ व पदग्रहण संपन्न झाले. यावेळी स्फूर्तीच्या अध्यक्षपदी आशा घारगे, उपाध्यक्षपदी नंदिनी जगताप, सेक्रेटरीपदी गीता ठोके व खजिनदारपदी सुयोगा शिंदे यांनी पदभार स्वीकारला.
सन 2019-20 साठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या अध्यक्षपदी अशोक शिंदे, सेक्रेटरीपदी श्रीराज दिक्षित, उपाध्यक्षपदी अनुप शिंदे, खजिनदारपदी साहिल शेख, कौन्सिल मेंबरपदी सयाजी चव्हाण यांची तर एक्झीक्युटिव्ह कमिटी मेंबरपदी तृप्तेश कदम, पृथ्वीराज पाटील, अजिनाथ शिराळ, ओंकार शिंदे, राजेंद्र शिंदे, सुरेश सुतार, संदीप जाधव, मनोज जैन, शशिकांत पाटील, कौस्तुभ मोरे, अनुप पोरे, संदीप जाधव, मनिषशेठ महाडवाले यांची निवड झाली आहे.
यावेळी बोलताना निमीष पटेल म्हणाले की, रेरा कायदा, जीएसटी यासारख्या बदलांना बांधकाम व्यवसायाला सामोरे जात असताना याकडे सकारात्मक पध्दतीने सामोरे गेले पाहिजे. यापुढील काळात असोसिएशनच्या सदस्यांनी एकत्रितपणे प्रकल्पांची उभारणी करावी. बिल्डर्स असोसिएशनची सातारा शाखा ही देशातील सर्वात तरूण टीम असून देशात याशाखेचा दुसरा क्रमांक लागतो.
यावेळी मावळते अध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी आपल्या भाषणात वर्षभर सर्व सदस्यांनी दिलेल्या सक्रीय पाठिंब्यामुळे सातारा सेंटरची प्रगती साधता आली असे नमूद केले. मावळते सेक्रेटरी नितीन माने यांनी वर्षभराचा इतिवृत्तांत व विविधकार्यक्रमांची पाहिती उपस्थितांना करून दिली. यावेळी नूतन अध्यक्ष अशोक शिंदे यांनी आपल्या मनोगतात यावर्षी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती तसेच बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून वर्षभर विविध राबविल्या जाणार्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सयाजी चव्हाण, नितीन माने, अशोक शिदे व पदाधिकार्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , फेटा व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे निटनेटके सूत्रसंचालन अनिल दातीर , अनुप पोरे, ओंकार शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन नूतन सेके्रटरी श्रीराज दिक्षित यांनी केले. या कार्यक्रमाला बिल्डर्स असोसिएशनचे पुणे, मुंबई, सांगली, बारामती, फलटण, वाई, कोल्हापूर, अहमदाबाद, उल्हासनगर येथील पदाधिकारी व सातारा शाखेचे पदाधिकारी, सदस्य व कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व कालिका स्टील यांनी स्वीकारले होते.
बीएआय सातारा सेंटरचा देशभरात नावलौकीकः निमीष पटेल
RELATED ARTICLES