Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीढोणीचावाडा येथे दि.30 व दि.1 रोजी भंडारा उत्सव

ढोणीचावाडा येथे दि.30 व दि.1 रोजी भंडारा उत्सव

सातारा :श्री विठ्ठल-रखुमाई भंडारा उत्सव महाराष्ट्रदिनी बुधवार दि.1 मे रोजी ढोनीचावाडा, ता.पाटण येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
पूर्वसंध्येला मंगळवार दि.30 रोजी सायंकाळी 6 वा.हरिपाठ,7.30 वा.फलाहार,रात्री 9 वा.कीर्तन-ह.भ.प.रमेश घडशी(चिपळूण) यांचे संपन्न होणार आहे. 11 वा.श्री गुरुकृपा भजन मंडळ,वांझोळे यांचा संगीत भजनाचा हरिजागर आयोजित होणार आहे.
बुधवार दि.1 मे रोजी सकाळी 9 वा.महाआरती, 11 वा.महाप्रसाद,दुपारी 2 वा.पालखी सोहळा,सायंकाळी 4 वा.श्री सत्यनारायण महापूजा,रात्री 7.30 वा महाप्रसाद व 9 वा.भारुडी भजनाचा सामना-धोंडेवाडी (मायणी),ता.खटाव येथील चंद्रसेन प्रासादिक नाट्यरूपी भारुडी भजनी मंडळ यांच्या विरुद्ध हनुमान प्रासादिक नाट्यरूपी रंगीत भारूडी भजनी मंडळ,गोवार यांच्यात रंगणार आहे.तेव्हा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular