कराड: ओंड,ता.कराड येथे दि.20 एप्रिल 1938 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र मजूर पक्ष व जनता पत्राच्या सभासद नोंदणीसाठी झालेली सभा हा दिवस प्रेरणादिन म्हणून ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने साजरा करण्यात आला.
ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या कराड येथील ज्ञानदीप कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात आयोजित प्रेरणादिन कार्यक्रमास स्वदेश फौंडेशनचे समन्वयक विक्रांत मोरे, संचिता साळुंखे, संजय साठे, संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, उपाध्यक्ष अमोल कांबळे, संचालक संभाजी जमाले, मधुराणी थोरात, ग्रामसेवक राम सावंत, प्रशिक्षिका मृणाल गरुड, वैशाली ताटे, सुवर्णा सुर्वे, किशोर थोरात आदींसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी संविधान विषयावर बोलताना काजल शिंदे म्हणाल्या, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे संविधान लिहून खर्याअर्थाने भारताची प्रतिष्ठा जगाच्या नकाशावर उतरवली.
या संविधानानुसार आपण आयुष्यात वाटचाल करुन स्वत:बरोबरच देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
देशाचे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री भारतरत्न स्व.पंडित गोविंद वल्लभ पंत, ज्येष्ठ साहित्यिक कृ.पा.कुलकर्णी, छत्रपती शाहू महाराज यांनी गौरव केलेले लोकशाहीर रघुनाथ चुडाप्पा भोसले-दांगट आदींसह उच्च शिक्षितांचे गाव, ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्राचा वारसा ओंड गावाला आहे.
या गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळात या झालेल्या भव्य सभेमुळे गावाला ऐतिहासिक महत्व वाढले असल्याने तो दिवस हा प्रेरणादिन म्हणून साजरा केला असल्याचे आनंदा थोरात यांनी सांगितले. विक्रांत मोरे व संजय साठे यांनी मार्गदर्शन केले. किशोर थोरात यांनी स्वागत केले. अर्चना पाटील यांनी सुत्रसंचालन केले. स्नेहा जाधव यांनी आभार मानले.
डॉ.आंबेडकर यांच्या झालेल्या सभेचा दिवस प्रेरणादिन म्हणून साजरा
RELATED ARTICLES