वाई : गौरव प्रकाश चव्हाण (वय 10, रा. वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) या अल्पवयीन मुलाचा मृतदेह धोम डाव्या कालव्यात आढळला. याबाबतची फिर्याद आई अश्विनी प्रकाश चव्हाण (वय 28) यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली होती.
वाई पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि. 28 रोजी रात्री आठच्या सुमारास गौरव हा गंगापुरी येथील यात्रा मैदानावर मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणून गेला. रात्री उशीर झाला तरी सापडला नाही म्हणून सोमवार दि. 29 रोजी दुपारी दोन वाजता हरविल्याची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान धोम डाव्या कालव्यात देगांव गावाच्या हद्दीत परिसरातील नागरीकांना मुलाचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी जावून खात्री केली असता सदरचा मृतदेह हा गौरवचाच होता. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सी. आर. कदम करीत आहेत.
वाई येथील अल्पवयीन मुलाचा धोम डाव्या कालव्यात मृतदेह आढळला
RELATED ARTICLES