Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीझोपडपट्टीधारकांचे ठिय्या आंदोलन: मुख्याधिकारी कक्षाबाहेर घोषणाबाजी

झोपडपट्टीधारकांचे ठिय्या आंदोलन: मुख्याधिकारी कक्षाबाहेर घोषणाबाजी

कराड: पालिकेकडून नव्याने उभारण्यात येणार्‍या घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी दबाव तंत्राचा वापर करून बारा डबरी परिसरातील झोपडपट्टी हटविण्यात येत आहे, असा आरोप करून झोपटपट्टीधारंकाचे अन्यत्र पुनवर्सन करावे, या मागणीचे निवेदन देण्यासाठी झोपडपट्टीधारकांनी आज पालिकेत धाव घेतली. दरम्यान, निवेदन देण्यासाठी आलेल्या झोपडपट्टीवासीयांनी पालिकेत येऊन मुख्याधिकार्‍यांची प्रत्यक्ष भेट न झाल्याने त्यांच्या कक्षाबाहेर ठिय्या मारून झोपडपट्टीधारकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
गेल्या काही दिवसांपासून बारा डबरी परिसरातील झोपडपट्टीवासीयांना पालिकेचे काही कर्मचारी नाहक त्रास देऊन या परिसरातून अन्यत्र स्थलांतर होण्याबाबत दबाव टाकत असल्याचे झोपडपट्टीधारकांचे म्हणणे आहे. त्यासाठी या परिसरातील पर्थादवे बंद ठेवणे, नागरिकांना पिण्याचे पाणी भरू न देणे, सार्वजनिक शौचालयाचा वापर करून न देणे असे प्रकार सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
संबंधित कर्मचारी या परिसरातील नागरिकांना वारंवार दबाव आणून आठ दिवसांत झोपडपट्टी सोडून अन्यत्र स्थलांतर न झाल्यास झोपड्या डोजरच्या साह्याने तोडून टाकू, अशी धमकी देत असल्याने त्याबाबतचे निवेदन देण्यासाठी झोपडपट्टीवासीय आज सकाळी अकराच्या सुमारास पालिकेत आले. सुमारे तास होऊनही मुख्याधिकारी यशवंत डांगे त्यांच्या कक्षात न आल्याने दुपारी बाराच्या सुमारास झोपडपट्टीवासीयंाना संतप्त झाले. त्यांनी मुख्याधिकारी कक्षाबाहेर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular