Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीफलटण येथील शिवसेना तालुका प्रमुख राहुल देशमुख यांचा शॉक लागून मृत्यू

फलटण येथील शिवसेना तालुका प्रमुख राहुल देशमुख यांचा शॉक लागून मृत्यू

फलटण : हनुमंतवाडी तालुका फलटण येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुल देशमुख यांचे आज सकाळी राहत्या घरी इलेक्ट्रिक गिझर मधून पाणी काढत असताना विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुल सदाशिव देशमुख (वय 31) रा. हनुमंतवाडी ता. फलटण हे आज सकाळी आंघोळीसाठी इलेक्ट्रिक गिझर मधून पाणी काढत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. विजेच्या धक्क्यामुळे ते गंभीर जखमी झाले. कुटुंबियांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तत्काळ राहुल देशमुख यांना बारामती मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राहुल देशमुख शिवसेनेमध्ये सक्रिय होते. शिवसेनेचा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. राहूल देशमुख यांच्या निधनामुळे ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारा शिवसैनिक हरपला आहे. ग्रामीण भागात शिवसेच्या शाखा निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. शिवसेनेचा आक्रमक आणि ग्रामीण बाज असलेला चेहरा होता. त्यांनी फलटण तालुका प्रमुख म्हणून खूप वर्ष काम केले शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदाची यशस्वी धुरा सांभाळली होती.
सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागात पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान मोलाचे होते. मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या या अपघाती निधनामुळे फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील व भाऊ असा परिवार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular