Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीशिवसमर्थच्या खानापुर शाखेचे 29 एप्रिल रोजी नवीन जागेत स्थलांतर

शिवसमर्थच्या खानापुर शाखेचे 29 एप्रिल रोजी नवीन जागेत स्थलांतर

तळमावले: दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि;तळमावले च्या खानापुर शाखेच्या स्थलांतरानिमित्त सोमवार दि.29 एप्रिल,2019 रोजी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होत, यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.जनार्दन बोत्रे,कोर्डिरिओ कॅजीटण (डेव्हलपर्स गोवा),शिवानंद पाटील (माजी सैनिक),रामचंद्र परवी,अ‍ॅड.हेमंत साळगावकर,अ‍ॅड.राम पारिश्‍वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.या शाखेचा स्थलांतर कार्यक्रम खानापुर शाखा : ज्योतिर्लिंग कृपा,गाळा नं 1,बिल्डींग नं.1519 बेळगाव-गोवा रोड खानापुर,ता.खानापुर जि.बेळगाव.पिन-591 302  फोन :(08336)223844 या ठिकाणी संपन्न झाला. त्यानिमित्त थोडंसं…दि.15 ऑगस्ट 2006 रोजी शिवसमर्थ ग्रा.बि.शे.सहकारी पतसंस्था मर्यादित तळमावले या ठिकाणी संस्थेची स्थापना केली. पूर्णवेळ सहकार क्षेत्र निवडत समाजातील सर्व थरातील व क्षेत्रातील घटकांना/सहकार्‍यांना बरोबर घेवून सर्व कर्मचारी,अधिकारी यांच्यावर जास्तीत जास्त जबाबदारी देवून संस्था अधिक क्रियाशील कशी राहील यासाठी संपुर्ण प्रयत्न करून सहकारास चळवळीची जोड दिल्यास संस्था अधिक जोमाने वाढते.संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकुण 33 शाखा कार्यरत असून नियोजित पाच शाखा आहेत.स्वच्छ, पारदर्शक कारभाराने लोकांच्या विश्‍वासास पात्र ठरल्याने अवघ्या 13 वर्षात 33 शाखांसह संस्थेने 175 कोटींची उलाढाल केली आहे. त्याचबरोबर चांगला नावलौकीक प्राप्त केला आहे. 365 दिवस 12 तास अविरत सेवा कार्यरत असते. बदलत्या डिजीटालयझेशन युगामध्ये मिनी ए.टी.एम, ए.टी.एम, आर.टी.जी.एस, एन.इ.एफ.टी, इत्यादी सुविधा देत आहे. संस्थेचे स्वमालकीचे प्रशस्त मुख्य कार्यालय तळमावले येथे आहे.स्वतंत्र सी.बी.एस यंत्रणा आहे,त्यामुळे सर्व शाखा मुख्य कार्यालयाशी ऑनलाइन पध्दतीने जोडल्यामुळे अचुक व तत्पर सेवा देता येते. याशिवाय संस्था व परिवार यांच्यावतीने गेल्या पाच वर्षापासुन गणराया अ‍ॅवार्ड हा उपक्रम राबवण्यात येत आहे.सन 2016 पासून शिवसमर्थ गौरव भूषण पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. संस्थेची सामाजिक कार्य- पिण्याच्या पाण्याची विहीरीतील गाळ काढणे व साफसफाई शिबेवाडी (गुढे)सन 2017,मान्याचीवाडी (गुढे)डोंगरावर स्मशानभुमी सन 2018 व पिण्याच्या पाण्याची साफसफाई करण्यात आली.गरजू व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, होतकरु विद्यार्थ्यांना वहया पुस्तकांचे वाटप, महिला कुस्तीपट्टू काजल जाधव, अंध विद्यार्थी तेजस कुंभार या विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. गरजू स्त्री-पुरुष लोकांना वैद्यकीय मदत, सामाजिक कार्य करत असलेल्या गणेश मंडळे, नवरात्र मंडळ, देवी उत्सव,सार्वजनिक पारायण मंडळे इ.ना भरीव मदत, संस्थेतील संचालक /सल्लागार/ अधिकारी / पदाधिकारी / कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करणे, व्यापारी, संचालक, सल्लागार,अधिकारी यांच्या कलागुणांना वाव देणे, सन 2017 पासून तळमावले येथील मुख्य कार्यालयात लालबागच्या राजाची प्रतिकृतीची 11 दिवस प्रतिष्ठापना करण्यात येते. सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी संस्थेचे संदिप डाकवे,नितिन पाटील,नानासो सावंत,सुनिल ढेंबरे,श्रीधर हावळे,विलास घारे,अनिकेत घारे,प्रशांत अडसर,शिवाजी डांगी,शिवाजी परीट,नुपुर दळवी,सौ.सुजाता शेठ,रेणुका गोरल,अपर्णा यादवशेठ,अक्षता कोलकार,सोनम अंधारे,अंजना देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular