म्हासुर्णे ः ता.खटाव येथे सालाबादप्रमाणे गुरुवर्य पठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज ,वडगांव (ज स्वा) गुरुवर्य मठाधिपती मारुती (मामा)कराड यांच्या आशिर्वादाने आणि ह.भ.प.बंडा महाराज (कराड)ह.भ.प नामदेव आप्पा शामगांवकर यांच्या मार्गदर्शनाने श्री संत ज्ञानोबाराय ,तुकोबाराय व श्री विठ्ठल रखुमाई मुर्ती प्राणप्रतिष्ठा वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे .व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प.पंढरीनाथ महाराज म्हासुर्णेकर काम पाहणार आहेत.
शुक्रवार दि.3/5/2019ते शुक्रवार 10/5/2019 अखेर संपन्न होत आहे. पहाटे 4 ते 6 काकड आरती , सकाळी 8 ते 11 ज्ञानेश्वरी वाचन , दुपारी 1ते 4 सामुदायिक भजन,सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ ,रात्री 9 ते 11 किर्तन ,रात्री 11ते 4 हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार3/5/2019 रोजी ह.भ.प.अमोल महाराज शेगांव,शनिवार 4/5/2019 रोजी ह.भ.प.चंद्रकांत महाराज धायगुडे केडगांव ,रविवार 5/5/2019 रोजी ह.भ.प. गोरख रावते महाराज पपंढरपुर,सोमवार 6/5/019 ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील आळंदी,मंगळवार 7/5/2019 रोजी ह.भ.प.नामदेव महाराज लवटे पंढरपूर ,बुधवार 8/5/2019 रोजी ह.भ.प.बंडा महाराज कराडकर,गुरुवार 9/5/2019 रोजी ह.भ.प.नामदेव आप्पा महाराज शामगांवकर या महाराजांची किर्तने होणार आहेत.
गुरुवार 9/5/2019 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 6 दिंडी सोहळा आयोजित केला आहे शुक्रवार 10/5/2019 रोजी ह.भ.प.नामदेव आप्पा महाराज शामगांवकर यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन सकाळी 10ते 12 या वेळेत होणार आहे .व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसाद होईल.
सर्व वाचकांचे अन्नदाते कदम परिवार बामणकी,शंकर दाजी चव्हाण ,नृसिंह सेवा मंडळ खुंटओढा,मालनताई काटकर व माने परिवार,वसंत विष्पू सांळुखे व राजकुमार बाबुराव विभुते,रघुनाथ आकाराम माने,अशोक भगवान माने (शेठ) विलास श्रीपती माने (नाथाआण्णांचा मळा),बाबुराव रघुनाथ माने,सिताराम तुकाराम माने व दशरथ पांडुरंग माने,दिनकर सुर्यवंशी शेठ,संतोष भाऊसो पाटील,अनंत लक्ष्मण कुंभार,शिवक्रांती मित्र मंडळ ,शिवनगर,दिलीप शेठ वाठारकर यांनी अन्नदानासाठी विशेष सहकार्य केले. अशा पद्धतीचे नियोजन ह.भ.प.मुंबईकर व म्हासुर्णे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा सप्तशताब्दी महोत्सव समिती म्हासुर्णे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
म्हासुर्णेत ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह सोहळा
RELATED ARTICLES