Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीकरिअर करण्याची अनेक क्षेत्रात चांगली संधी: प्रशांत राऊत

करिअर करण्याची अनेक क्षेत्रात चांगली संधी: प्रशांत राऊत

पाटण: आजच्या मुला-मुलींना शिक्षणानंतर पुढील करिअर करण्याची अनेक क्षेत्रात चांगली संधी आहे. निश्चित ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. ध्येय नसेल तर मुले-मुली नको त्या क्षेत्रात भरकटत जातात. आताच्या स्पर्धात्मक युगाच्या परिस्थितीनुसार ज्या क्षेत्रात संधी आहे त्या क्षेत्रात संधी निर्माण करावी. व उच्च अधिकारी व्हायच स्वप्न साकार करावे असे दापोलीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत मुळगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
मुळगाव ता. पाटण येथे यमाईदेवी सामाजिक विकास संस्था मुळगाव यांच्या वतीने जि.प.शाळा मुळगाव या ठिकाणी 10 वी 12 वी ते पदवी नंतर च्या मुलां-मुलींना व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर शनिवार दि. 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विनय बोलके वित्त व लेखा अधिकारी सातारा, विजय खांडके, पाटण तालुका मित्र परिवार गृपचे ज्येष्ठ सदस्य मारूती पाटील, तानाजीराव गुजर, आनंदराव जाधव, संजय कांबळे, राजाराम मोळावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विनय बोलके म्हणाले की. तरुण-तरुणींनी आपल्या करिअरसाठी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे यासाठी अवांतर वाचन केले पाहिजे. सामान्य ज्ञान वाढवले पाहिजे. ठरवले आहे. त्याचा कृतिशील कार्यक्रम ठरवून चालले पाहिजे. ग्रामीण भागामधील मुले -मुली घरच्या गरिबीमुळे निश्चित ध्येय ठेवत नाहीत. वाढत्या स्पधेॅत मी टिकणार नाही. हा नकारात्मक न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. हा न्यूनगंड पायातील बेड्या आहेत. त्या काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आत्मविश्वास व जिद्द पाहिजे. ठरवलेल्या ध्येयावर ठाम राहून आत्मविश्वास वाढवला तर दैवी चमत्कारा सारखे यश मिळते. मुला-मुलींनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने अहोरात्र मेहनत घेणे आवश्यक आहे.आपला मुलगा किंवा मुलगी 10वी,12वी, किंवा पदवी नंतर पुरेशी माहिती नसल्या मुळे कोणत्या क्षेत्राची निवड करायची हे समजत नाही.
पुरेशी माहिती नसल्यामुळे क्षेत्र निवडण्यासाठी संकोच होतो. त्यासाठी मुलांना व पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यमाईदेवी सामाजिक विकास संस्थेचे गणेश मोळावडे यांनी सांगितले. यावेळी विजय खांडके, संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व आभार गणेश मोळावडे यांनी मानले, शिबीरासाठी सुनिल मोळावडे, गणेश सुतार, यांचेसह मुले -मुली,शिक्षक, पालक, उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular