सातारा : झाडू ते खडू असा प्रवास करणारे जगताप यांनी खडतर असा प्रवास केला आहे.सायगाव मातीमध्येच प्रारंभ व शेवटही झाल्याने दुग्धशर्करा योग आलेला आहे. आजच्या पिढीने आदर्श घेऊन सकारात्मक वाटचाल केली तर यश मिळू शकते.शिक्षकच राष्ट्रनिर्माण करण्यास महान असे सहाय्य करतात.खरोखरच प्राचार्य जगताप यांचा चित्तथरारक प्रवास नव्या पिढीला आदर्शवत ठरेल.असे प्रतिपादन चित्रपट लेखक,साहित्यिक तथा साताराभूषण प्रताप गंगावणे यांनी केले .
सायगाव,ता.जावली येथील लोहिया विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नंदकिशोर जगताप यांनी प्रदीर्घ 39 वर्ष सेवा केेल्यानंतर त्यांचा सेवानिवृत्तीबद्धल सत्कार संपन्न झाला.तेव्हा प्रमुख अतिथी म्हणून गंगावणे मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी कोयना एज्यूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष धोंडीराम जाधव होते.यावेळी संस्थेचे सचिव डी. के.जाधव,गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण,सिने अभिनेते समृद्धी जाधव, जिल्हा परिषद माजी सदस्य धोंडीराम जंगम ,सरपंच अजित आपटे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य नंदकिशोर जगताप यांनी लिहिलेल्या,मागे वळून पाहताना-एक आत्मकथा याप्रतीचेे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महाळाप्पा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पी.टी. खाडे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद,पालक,अध्ययनार्थी,शिक्षणप्रेमी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
झाडू ते खडू असा प्राचार्य जगताप यांचा चित्तथरारक प्रवास:प्रताप गंगावणे
RELATED ARTICLES