Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीअजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकर अ‍ॅप सुरू

अजिंक्यतारा – कनेक्टींग सातारकर अ‍ॅप सुरू

सातारा : सातारकर म्हणजे मेहनती, खूप कष्ट करणारे आत्मविश्वासू, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वत:ला झोकून देणारे लोक अशी ओळख जागतिक स्तरावर आहे… ही ओळख आणखी दृढ करण्यासाठी कोण ना कोण सातारकर सातत्याने प्रयत्न करत असतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तारळे खोर्‍यातील जोतिराम सपकाळ आणि रजनीकांत पवार.
माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, मुरुडमधून घेतले. तसेच आपले बारावीपर्यंतचे शिक्षण खेडेगावात राहून पूर्ण केले, तसेच पुढील शिक्षण नोकरी करत करत मुंबईमधून पूर्ण केले. काही वर्षे नोकरी आणि नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला.सातारकर विद्यार्थी, तरुण, शेतकरी, गृहिणी, नोकरदार आणि उद्योजक यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारे अजिंक्यतारा – कनेक्टींग सातारकर अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपची वैशिष्ट्ये म्हणजे अजिंक्यतारा – कनेक्टींग सातारकर हे सातारकर समुदायासाठी तयार केलेले जगातील पहिले लोकल सर्च इंजिन आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल 850 लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. अजिंक्यतारा – कनेक्टींग सातारकरचा उद्देश एका सातारकराचे दुसर्‍या सातारकरासोबत विश्वासाचे नाते प्रस्थापित होत आहे. या अ‍ॅपचा फायदा शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, गृहिणी या सर्वांनाच होईल, असा विश्वास उद्योजक हणमंतराव गायकवाड, चिन्मय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
अजिंक्यतारा-कनेक्टिंग सातारकर मिशन
सातारकरांना वेगवान, विनामूल्य, विश्वासार्ह आणि व्यापक माहिती उपलब्ध करून देणे आणि सातारकर उद्योजकांना इतर सातारकर बरोबर कनेक्ट करणे, हे मिशन या माध्यमातून साध्य केले जाणार आहे.
शेतीमालालाही बाजारपेठेत मिळणार
सातारकर मग तो मुंबईत राहतो की काश्मिरमध्ये! तो व्यवसाय काय करतो?, याची इतंभूत माहिती या अ‍ॅपवर आहे. मुंबईत गेल्यानंतर टॅक्सी चालक सातारचाच शोधून सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहोचणे सोपे होणार आहे. जिल्ह्यातील ताजा शेतीमालही विकणे सोपे जाणार आहे. दरम्यान या अ‍ॅपचा लोकार्पन सोहळा दि. 5 रोजी सां. 5 वा. जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरटीओ यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular